AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांच्याशी ‘सामना’ करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सज्ज, आता हाती घेणार ‘कलम’

'सामना'मधून संजय राऊत यांनी सत्ताधारी आणि सहकारी पक्षांवरही टीका करण्यात येते. त्यावरून संजय राऊत यांना प्रत्युत्तरही देण्यात येते. मात्र, आता संजय राऊत यांचा थेट 'सामना' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होणार आहे. एकनाथ शिंदे आता हाती 'कलम' घेणार आहेत.

संजय राऊत यांच्याशी 'सामना' करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सज्ज, आता हाती घेणार 'कलम'
CM EKNATH SHINDE AND SANJAY RAUT Image Credit source: TV9 NETWORK
| Updated on: May 11, 2023 | 1:11 PM
Share

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उठाव केलेल्या आमदारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. शिवसेनेचे ‘सामना’ या मुखपत्रामधूनही एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मंत्री, आमदार, नेते त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. ‘सामना’मधून संजय राऊत यांनी सत्ताधारी आणि सहकारी पक्षांवरही टीका करण्यात येते. त्यावरून संजय राऊत यांना प्रत्युत्तरही देण्यात येते. मात्र, आता संजय राऊत यांचा थेट ‘सामना’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होणार आहे. एकनाथ शिंदे आता हाती ‘कलम’ घेणार आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. लीट पदवी देऊन सन्मानित केले. त्यामुळे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावापुढे ‘डॉ.’ ही पदवी लागली आहे. त्यात आणखी एका पदवीची भर पडली आहे.

गेल्या मार्च महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी वाय पाटील विद्यापीठाने डी.लीट पदवी देऊन सन्मानित केले. डी वाय पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारोहात शिंदे यांना ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल मानद डी. लीट पदवी प्रदान करण्यात येत आहे असे डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते.

डी. लीट पदवीमुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावापुढे आता ‘डॉ.’ अशी पदवी लिहिण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या पदवीत आणखी एका पदवीची भर पडली आहे. ज्यामुळे ते थेट संजय राऊत यांच्याशी सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम 77 टक्के गुणांसह पूर्ण केला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना वृत्तपत्रविद्या आणि जन संज्ञापन पदविका शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.

ऑगस्ट 2021 मध्ये विशेष प्रावीण्यासह अर्थात 77.25 टक्के गुण मिळवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू पाटील, कुलसचिव भटप्रसाद पाटील यांनी प्रमाणपत्र सुपूर्द केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी मुक्त विद्यापीठाची बी. ए. पदवी तसेच मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षण क्रमही विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.