AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘अरे ये ना, यावच लागणार आहे’ सुप्रीम कोर्टाबाहेर आमने-सामने येताच राऊतांचं शिंदे शिवसेनेच्या नेत्याला ओपन चॅलेंज VIDEO

Sanjay Raut : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? यावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेना नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Sanjay Raut : 'अरे ये ना, यावच लागणार आहे' सुप्रीम कोर्टाबाहेर आमने-सामने येताच राऊतांचं शिंदे शिवसेनेच्या नेत्याला ओपन चॅलेंज VIDEO
Supreme Court Shivsena Hearing
| Updated on: Aug 12, 2026 | 10:13 AM
Share

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं, यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरु झाली आहे. मागच्या दोन-अडीच वर्षांपासून या खटल्याची सुनावणी रखडली होती. सतत सुनावणीच्या तारखा पुढे जात होत्या. पण आता सरन्यायाधीश सूर्यकांत, व्ही. मोहना आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर नियमित सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. मागच्या आठवड्यापासून कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरु आहे. कपिल सिब्बल रोजच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या निर्णयाची चिरफाड करत आहेत. निवडणूक आयोगाने 2023 साली एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली. त्यामुळे पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला मिळालं. उद्धव ठाकरे गटाला मशाल या नव्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहेत.

निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. कपिल सिब्बल यांनी याच मुद्यावरुन निवडणूक आयोगाला कोंडीत पकडलं आहे. विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष होत नाही, विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा एक भाग असतो असा कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद आहे. सर्वोच्च न्यायालय त्यांचा हा युक्तीवाद मान्य करणारी की, त्यांची काही वेगळी भूमिका असेल? हे निवडणूक निकाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. पण तूर्तास कालच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर एक गंमतीशीर घटना घडली. त्याचा व्हिडिओ सोशल माीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सुप्रीम कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?

सर्वोच्च न्यायालयात रोजची सुनावणी संपल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाकडून त्यांचे नेते मीडियाला बाईट देतात. उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत मीडियाशी बोलतात तर एकनाथ शिंदे गटाकडून खासदार नरेश म्हस्के संवाद साधतात. कालच्या सुनावणीनंतरही सर्वोच्च न्यायालयाबाहेर मीडियाचा असाच गराडा पडला होता. त्यावेळी संजय राऊत आणि नरेश म्हस्के आमने-सामने आले. यावेळी दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या संजय राऊत यांनी नरेश म्हस्के यांना आमने-सामनेच्या चर्चेसाठी बोलावलं.

पण म्हस्केनी नकार दिला. त्यावेळी राऊतांनी त्यांच्यासोबत असलेल्या अनिल देसाईंना ‘घेऊन ये त्याला’ असं म्हटलं. अनिल देसाई नरेश म्हस्केना आणण्यासाठी त्यांच्या दिशेने गेले. पण म्हस्के निघून गेले. त्यावेळी राऊतांनी मीडियाच्या कॅमेऱ्याकडे बघून म्हटलं, ‘अरे ये ना, यावच लागणार आहेना’. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Follow Us
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत