Sharad Pawar: एकनाथ शिंदेंनी शिवसेना कशी हायजॅक केली? शरद पवारांचं उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयावर बोट

शिवसेना संपुष्टात आली नाही, येणार नाही. बंड होत असतात. यापूर्वी भुजबळांनी बंड केलं. आमच्या पक्षात आले. काही झालं नाही. त्यानंतर निवडणुकीत एक सोडून भुजबळांसह सर्व पडले. त्यानंतर राणेंनी बंड केलं. तेही पराभूत झाले. साधारण शिवसेनेत असं आज झालं नाही. ज्यांनी बंड केलं, त्याबद्दल शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे संघटना अशी बंद पडत नसते.

Sharad Pawar: एकनाथ शिंदेंनी शिवसेना कशी हायजॅक केली? शरद पवारांचं उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयावर बोट
शरद पवारांचं उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयावर बोट
Image Credit source: tv9
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 30, 2022 | 10:33 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीवर भाष्य केले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोकळ्या मनाने राजीनामा दिला. हा निर्णय पक्षातील सहकाऱ्यांचं मत असेल तर माहीत नाही. ते लोकांवर विश्वास टाकतात आणि पूर्ण जबाबदारी देतात हा त्यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी आणि विधीमंडळाची संपूर्ण जबाबदारी शिंदेकडे दिली होती. त्याचा हा कदाचित परिणाम आहे की नाही मला माहीत नाही, असा टोला शरद पवार यांनी शिंदेंना लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी ग्रेसफुली राजीनामा दिला

मला माहीत नाही आधीच घडलं का ? राज्याच्या विधीमंडळाशी माझा संबंध राहिला नाही. ही तयारी आधीच असल्याशिवाय ते जाणार नाही. इथून सुरत, तिथली व्यवस्था. तिथून गुवाहाटी तिथली व्यवस्था, आणखी गोव्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी एका दिवसात होत नाही, असेही पवार म्हणाले. एकदा बहुमत असल्यावर त्यावर बाकी काही फार कटकटी करू नये. ग्रेसफुली अक्सेप्ट करावं आणि उद्धव ठाकरेंनी बहुमत नसल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यांनी ग्रेसफुली राजीनामा दिला. ते सत्तेला चिपकून राहिले नाही. ही माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे.

शिवसेना संपुष्टात आली नाही

यावेळी शरद पवारांनी राजकारणाच्या इतिहासातील बंडखोरीची उदाहरणे दिली. शिवसेना संपुष्टात आली नाही, येणार नाही. बंड होत असतात. यापूर्वी भुजबळांनी बंड केलं. आमच्या पक्षात आले. काही झालं नाही. त्यानंतर निवडणुकीत एक सोडून भुजबळांसह सर्व पडले. त्यानंतर राणेंनी बंड केलं. तेही पराभूत झाले. साधारण शिवसेनेत असं आज झालं नाही. ज्यांनी बंड केलं, त्याबद्दल शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे संघटना अशी बंद पडत नसते. 1981 मध्ये माझ्या नेतृत्वात 67 आमदार निवडून आले. सहा महिन्यांनी निवडणूक झाल्यावर मी सुट्टीला गेलो होतो. दहा दिवसांनी परत आलो. त्यावेळी माझ्यासह सहा लोक राहिले. मी 67 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो. मी पाच लोकांचा नेता राहिलो. माझं पदही गेलं. पण त्यानंतर निवडणूक झाली. मला सोडून गेलेल्या सर्वांचा पराभव झाला आणि माझी टीम 73 झाली. (After the swearing in of Eknath Shinde, NCP President Sharad Pawar targeted the rebel MLAs)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें