AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manikrao Kokate : सर्वांत मोठी बातमी! अखेर कोकाटेंना रमीचा डाव भोवला, कृषी खातं काढून घेतलं जाणार

राज्याच्या राजकारणातील मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखातं काढून घेतलं जाणार आहे.

Manikrao Kokate : सर्वांत मोठी बातमी! अखेर कोकाटेंना रमीचा डाव भोवला, कृषी खातं काढून घेतलं जाणार
manikrao kokate
| Updated on: Jul 31, 2025 | 4:04 PM
Share

Manikrao Kokate : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत होते. पावसाळी अधिवेशन चालू असताना ते सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळताना आढळले होते. ते गेम खेळताचा व्हिडीओही सगळीकडे व्हायरल झाला होता. दरम्यान, हा कोकाटेंच्या या कृतीमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सरकारवर मोठा दबाव वाढला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखातं काढून घेतलं जाणार आहे.

नेमका निर्णय काय घेतला जणार?

गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात होती. त्यासाठी राज्यभर आंदोलनेही झाली. विरोधकांचा आणि जनतेचा पवित्रा लक्षात घेता आता मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखाते काढून घेतले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्या खात्याचा कारभार अन्य नेत्याकडे सोपवला जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

कोकाटेंना अन्य खात्याची जबाबदारी?

नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात बैठक झाली आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांच्यावर अन्य खात्याची जबाबदारी सोपवली जाईल, असे सांगितले जात आहे.

कोकाटे यांना कोणती नवी जबाबदारी मिळणार?

आज संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्षाचेच दत्ता भरणे आणि मकरंद पाटील या दोन्ही मंत्र्यांकडे असलेली खाती ही माणिकराव कोकाटे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर कोकाटे यांना दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील या दोन मंत्र्यांच्या खात्यांपैकी एक खाते दिले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विरोधक काय भूमिका घेणार?

दरम्यान, कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचे खातेबदल केले जाऊ शकते. त्यामुळे आता विरोधक नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....