AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काल मी जे काही बोललो ते…; वादाचं काहूर माजल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया

Jitendra Awhad clarification Statement About Ram : जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. आव्हाडांवर टीकेची झोड उठली. त्यानंतर आव्हडांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली.

काल मी जे काही बोललो ते...; वादाचं काहूर माजल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
jitendra awhad
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 04, 2024 | 12:54 PM
Share

मुंबई | 04 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल एक वक्तव्य केलं. प्रभू राम मांसाहारी असल्याचं आव्हाड म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी नेहमी महाराष्ट्राला संबोधित करत असतो. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचा विपर्यास करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. मी इतिहासाची मोडतोड करत नाही तर काही पुराव्यांच्या आधारे आपण हे वक्तव्य केल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

आव्हाड यांचं स्पष्टीकरण

राम- प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रात रामकृष्ण हरी म्हणतो. जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे. त्या श्रीरामाबद्दल बोलताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाहीये. पण जे याच्या विरोधात उभे राहिलेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो. वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत. त्यातल्या अयोध्या कंदातील सर्ग 52 आणि श्लोक 102 यात हा उल्लेख आहे. मात्र मला हा वाद वाढवायचा नाही म्हणून मी हे वाचून दाखवत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

“मी अभ्यासाशिवाय बोलत नाही”

मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्त्याव्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर मी दिलगीरी व्यक्त करतो. मी गुन्ह्याला घाबरत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. राम हा बहुजनाचा आहे आणि आमचा राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. यांना राम आत्ता निवडणुकीकरिता हवा आहे. आमचा राम हा मनात आहे, असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

आव्हाडांकडून सिनेमाचा उल्लेख

आता वाल्मिकी रामायणात काही लिहिलेलं असेल. त्यावर कुणाचा आक्षेप असेल. तर त्यांनी ते सांगावं. 1 डिसेंबर 2023 अन्नपुराणी नावाचा एक सिनेमा आलाय. दक्षीणेतेली दोन सुपरस्टारने यात काम केलंय. यात त्यांनी श्लोक म्हणून दाखवला आहे. त्याचा अर्थही सांगितला आहे. ते तुम्ही पाहू शकता. मी केलेलं वक्तव्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?