उन्हाळाच्या तीव्र झळा, अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांची पाण्यासाठी लाहीलाही, भीषण वास्तव

अहमदनगर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात दुष्काळ पाणी नसल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. जिल्ह्यातील 291 गावांत तर 1544 वाड्या वास्त्यावरील 5 लाख 70 हजार लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

उन्हाळाच्या तीव्र झळा, अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांची पाण्यासाठी लाहीलाही, भीषण वास्तव
अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांची पाण्यासाठी लाहीलाही, भीषण वास्तव
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 10:06 PM

अहमदनगरला जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात पाणी संकट निर्माण झालीय. पाहिजे तितका पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झालीय. तब्बल सहा-सहा दिवस पाणी येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात 312 टँकर सुरु करण्यात आले आहेत. सर्वाधिक 99 पिण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत. मात्र पिण्याचे टँकर देखील 5-5 दिवस येत नाहीत. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात दुष्काळ पाणी नसल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. जिल्ह्यातील 291 गावांत तर 1544 वाड्या वास्त्यावरील 5 लाख 70 हजार लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात पाण्याचे साठे कोरडे पडल्याने दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. दरम्यान गेल्या दीड महिन्यापासून निवडणुकीत व्यस्त असलेल्या प्रशासनाला आता पाणी पुरवठ्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

खरंतर जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात पाण्याच्या टँकरला मागणी होत होती. आता टँकरची संख्या 312 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात लक्ष देण्याची मागणी नागरीक करत आहेत.

जिल्ह्यात कुठे किती पाण्याचे टँकर सुरु?

 • संगमनेर – 27 टँकर
 • अकोले – 5
 • कोपरगाव – 3
 • नेवासा – 3
 • नगर – 29
 • पारनेर – 34
 • पाथर्डी – 99
 • शेवगाव – 11
 • कर्जत – 42
 • जामखेड – 23
 • श्रीगोंदा – 9
Non Stop LIVE Update
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर.
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले....
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी.
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज.
दया कुछ तो गड़बड़ है, पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक
दया कुछ तो गड़बड़ है, पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक.
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर.
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर.
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा.
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल.