AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ताईचे पराक्रम पाहिले ना…; सुजय विखेंच्या सभेत बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य गुन्हा दाखल

Vasantrao Deshmukh Controversial statement About Jayashree Thorat : भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर......

या ताईचे पराक्रम पाहिले ना...; सुजय विखेंच्या सभेत बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य गुन्हा दाखल
जयश्री थोरात, सुजय विखेImage Credit source: Facebook
| Updated on: Oct 26, 2024 | 12:44 PM
Share

सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील धांदरफळ इथं माजी खासदार, भाजपचे नेते, सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा झाली. या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची लेक जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे संगमनेर मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काल रात्री काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीची तोडफोडही केली आहे.

वसंतराव देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाली? हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वसंतराव देशमुख म्हणालेत.

वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा दाखल

वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची राज्यभर चर्चा होत आहे. वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. स्वत: सुजय विखे यांनीही या विधानाचा निषेध केला आहे. वसंतराव देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री आणि बहिण दुर्गा तांबे यांनी पोलीस ठाण्यासमोर बसून निषेध केला आहे.

सुजय विखेंची प्रतिक्रिया

जयश्री यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर तणावाचं वातावरण झालं आहे. सभा आटोपून परत जाणा-या सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही गाड्या अडवल्या गेल्या आणि त्यांची तोडफोड करत चिखली गावाजवळ जाळपोळ करण्यात आली आहे. यावेळी सुजय विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे वक्तव्य करणं चुकीचं आहे. वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. पण पोलिसांनी गाड्यांची जाळपोळ करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा. दंगल घडवण्याचं काम कोण करत आहे? हे पोलिसांनी पाहावं, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.