AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांनी घेतली आईच्या नावासह मंत्र्यांची नावे, म्हणाले, महाराष्ट्र ‘माझी बहिणी’मय झालाय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज पुण्यात शुभारंभ झाला. या वेळी राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. अजित दादांनी बोलताना म्हटले की, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे.

अजितदादांनी घेतली आईच्या नावासह मंत्र्यांची नावे, म्हणाले, महाराष्ट्र 'माझी बहिणी'मय झालाय
| Updated on: Aug 17, 2024 | 3:22 PM
Share

पुण्यात आज माझी लाडकी बहिण योजनेचा शुभांरभ करण्यात आला. यावेळी मंचावर बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांची नावे घेतना प्रत्येकाच्या आईचे नाव ही घेतले. ते म्हणाले की, महिला सक्षम झाली पाहिजे. महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात संधी दिलीये. महिला संसाराला लागल्यानंतर त्यांचं सर्व काही सासरच्या लोकांसाठी करणं सुरु असतं. पण त्यांना देखील स्वत:साठी काही तरी करण्याची इच्छा असते. त्यावेळी महिलांसाठी काय करता येईल याबाबत आम्ही विचार करत होता. त्यानंतर या योजनेचा विचार आम्हाला आला.

मंत्र्यांची नावे घेताना अजित पवारांनी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, मुरलीधर रुक्मिनी किसन मोहोळ आदिती वरदा सुनील तटकरे अशी नावे घेतली. ते म्हणाले की, ३४ वर्ष काम करत आहे. या काळात खासदारकीपासून सुरुवात केली. उपमुख्यमंत्री आहे. अनेक सरकारमध्ये काम केलं. वेगवेगळे कार्यक्रम पाहिले, जनतेची कामे पाहिले. आज राज्यातील सर्व जिल्ह्यात हा कार्यक्रम पाहत आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी बहिणीमय झाला. पहिल्यांदाच असं चित्र आहे. उद्या १९ तारखेला रक्षा बंधन आहे. बहीण भाऊ राखी बांधत असतो. अनेक महिलांनी आम्हाला राखी बांधल्या.

आमच्या मनात वेगळी काही भावना नव्हती. आपल्या राज्यातील महिला अधिक सक्षम झाली पाहिजे, सबल झाली पाहिजे. आपण चार महिलांची धोरणं आणली. महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा दिली. त्यांना विविध पदावर संधी दिली. त्यांनी या संधीचा चांगला वापर केला.

महिलांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागलं आहे. पाच महिने सरकारचे आहेत. तो पर्यंत तुम्हाला १५०० रुपये मिळणारच आहेत. तुम्ही जर आम्हाला साथ दिली तर तुमच्यासाठी आम्हाला अजून काही करता येईल. हे पैसे भाऊ बीज म्हणून तुम्हाला दिले आहेत. हा तुमचा हक्क आहे. कोणी काही बोललं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. दिलेली ओवाळणी ही तुमची आहे ती तुमच्याकडेच राहणार आहे. १ कोटीहून अधिक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी या योजना सुरु केल्या आहेत. या पैशांचा चांगला वापर करा. ज्या ज्या गोष्टी केल्या त्यापैकी आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. ही ओवाळणी सगळ्या बहि‍णींकडे पोहोचलेली आहे. या योजना पुढे चालू ठेवायच्या की नाही हे तुमच्या हातात आहे. महायुतीला मतदान करा.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.