पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम राज्यात राबवा, अजित पवारांचा गृहविभागाला सल्ला

पुणे ग्रामीण पोलीसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलीसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा', अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केल्या.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचा 'स्मार्ट पोलीसींग' उपक्रम राज्यात राबवा, अजित पवारांचा गृहविभागाला सल्ला
अजित पवार यांच्याकडून स्मार्ट पोलिसिंगचं उद्घाटनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 11:02 PM

पुणे : ‘बदलत्या काळात पोलीसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलीसींग’चा (Smart Policing) उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा’, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी केल्या. पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) मुख्यालयात सबसिडीअरी पोलीस कँटीनचे उद्घाटन, नूतनीकृत भीमाशंकर सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन, पोलीस दलाला डायल 112 उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या 10 चारचाकी वाहनांचे लोकार्पण पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच फियाट इंडिया कंपनीचे अध्यक्ष रवी गोगीया उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, काळानुसार तंत्रज्ञानात गतीने बदल होत आहेत ही बाब चांगली आहे. परंतु काही अपप्रवृत्ती त्याचा गैरवापरही करत आहेत. त्यासाठी पोलीस दलानेही नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण पोलीस दलाला डायल 112 साठीच्या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 2020-21 मध्ये 2 कोटी तर चालू आर्थिक वर्षात 1 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण पोलीस दलाला डायल 112 उपक्रमाला वाहने घेण्यासाठी सुमारे 12 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम मिळणार?

पोलीस ठाणे आणि इतर इमारतींच्या बांधकामासाठी 15 कोटी रुपये खर्च केला जात आहे. राज्यातही याच प्रकारे जिल्हा नियोजन समितीतून पोलीस दलाला पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जात आहे. नुकताच आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करुन 5 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून 10 टक्के म्हणजेच 50 लाख रुपये निधी त्या भागातील शासकीय इमारतींचे बांधकाम, दुरूस्ती आदींवर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, असंही अजित पवार म्हणाले. पोलीसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम देण्याची पूर्वीची योजना पुन्हा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

‘इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करावी लागतील’

पोलीस कल्याण निधीतून पाषण आणि बाणेर रोडवर उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपांना चांगला प्रतिसाद मिळत असून बाणेर येथील पेट्रोल पंपावर सीएनजी सेवा सुरू करण्यात आल्यामुळे निधीमध्ये अजून चांगली भर पडेल. पुढील काळात पोलीस दलालाही ई-वाहने देण्याचा प्रयत्न करणार असून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करावी लागतील, असेही पवार म्हणाले.

कोरोना काळात मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांना मदत

गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस हे 2 लाखांवर विशाल मनुष्यबळ असलेले पोलीस दल आहे. कोरोनाच्या काळामध्ये पोलीस दलाने स्वत:च्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता समाजाच्या सुरक्षिततेसाठी सेवा बजावली. सेवा बजावताना अनेक पोलीस कोरोनाला बळी पडले. त्यांच्यामागे शासन खंबीरपणे उभे राहीले. त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान, कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वा्यवर गतीने नोकरी देण्याची कार्यवाही करण्यात आली.

‘महाराष्ट्र पोलीसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार’

पोलीस दलात शिपाईपदावर भरती झालेल्यास पदोन्नतीने पोलीस उपनिरीक्षक पदावर जाण्याची संधी मिळावी यासाठी महत्वायाचा निर्णय शासनाने घेतला. पोलीसांच्या आरोग्य योजनेमध्ये सध्याच्या 39 आजारात नव्याने 19 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीसांच्या घरांसाठी गृहबांधणी अग्रीमाबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कोणतीही विपरीत परिस्थिती आली तरी गृहमंत्री म्हणून महाराष्ट्र पोलीसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार, अशी ग्वाही वळसे-पाटलांनी दिली. तसंच पोलीसांनी जनतेला चांगली कायदा व सुव्यवस्था द्यावी. त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही, असंही ते म्हणाले.

पुणे पोलिसांचा ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकात माहिती दिली, डायल 112 साठी जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या 1 कोटी रुपयांतून 10 चारचाकी व 12 दुचाकी वाहने घेण्यात आली आहेत. पोलीस कल्याण निधीतून सुरू करण्यात आलेल्या पेट्रोल पंपातून 1 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जिल्ह्यात 16 पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. फियाट इंडियाने आतापर्यंत 147 विद्यार्थ्यांना 81 लाख रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम दिली आहे. नूतनीकरण करण्यात आलेले भिमाशंकर सांस्कृतिक भवन पोलीस कुटुंबांच्या विवाह, वाढदिवस तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अल्प दराने देण्यात येते, असेही ते म्हणाले.

इतर बातम्या :

Breaking : दापोलीत हायव्होल्टेज ड्रामा! सोमय्या, राणे आणि कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत राडा; अखेर पोलिसांकडून अटक आणि हद्दपार

भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप करुन सरकारची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न : दिलीप वळसे पाटील

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.