VIDEO: अजितदादा आणि टोपे इन अ‍ॅक्शन; दर आठवड्याला कोरोनाबाधित जिल्ह्यांचा दौरा करणार

राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्या जिल्ह्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे दौरा करणार आहेत. (ajit pawar and rajesh tope will take covid review every week in covid affected district)

VIDEO: अजितदादा आणि टोपे इन अ‍ॅक्शन; दर आठवड्याला कोरोनाबाधित जिल्ह्यांचा दौरा करणार
ajit pawar


श्रीवर्धने: राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्या जिल्ह्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे दौरा करणार आहेत. पवार आणि टोपे दर आठवड्याला या कोरोनाबाधित जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. तशी माहितीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. (ajit pawar and rajesh tope will take covid review every week in covid affected district)

अजित पवार आज श्रीवर्धनेला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, त्या जिल्ह्यांना दर आठवड्याला मी आणि राजेश टोपे भेट देणार आहोत. या जिल्ह्यांना भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करणार आहोत, असं अजित पवार यांनी सांगितलं.

तिसरी लाट रोखण्याचा प्रयत्न

राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिसरी लाट येऊ नये, पण आलीच तर त्याचा मुकाबला करता यावा म्हणून आम्ही कोरोनाबाधित जिल्ह्यांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच टक्के आहे. किंवा त्यापेक्षा कमी आहे. तिथे आम्ही सुविधा देणार आहोत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि वर्धा येथे ही टक्केवारी दहा टक्के आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आरोग्य सुविधांची कमतरता आहे का? याची चौकशी केली जात आहे. सुविधा दिल्या दिल्या जाणार आहेत, असं ते म्हणाले.

म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनवरील जीएसटी हटवा

म्युकरमायकोसिसच्या आजाराने उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन खूप महागडे आहे. त्याबाबत केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीकडे या इंजेक्शनचा जीएसटी कमी करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

भाजपने धनगर आरक्षण दिलं नाही

यावेळी त्यांनी धनगर आरक्षणावरून तत्कालीन फडणवीस सरकारवर टीका केली. मागच्या सरकारने धनगर आरक्षण देण्याची घोषणा केली होती. पण पाच वर्षात आरक्षण दिलं नाही. एका संस्थेला धनगरांचा डाटा गोळा करण्याचं काम दिलं. त्याचा अहवाल आला. त्यात वेगवेगळ्या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे, असं सांगतानाच ज्यांना आधीच आरक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवराज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करा

यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. शिवराज्याभिषेक दिन घरीच साजरा करा. सणांपेक्षा माणसांचा जीव महत्त्वाचा आहे, असंही ते म्हणाले. (ajit pawar and rajesh tope will take covid review every week in covid affected district)

संबंधित बातम्या:

काँग्रेसने अण्णासाहेब पाटलांची हत्याच केली; विनायक मेटेंचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणासाठीच्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

अदिती चांगलं काम करतेय, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो : अजित पवार

(ajit pawar and rajesh tope will take covid review every week in covid affected district)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI