ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचं नाव दिलं जाणार, पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी मान्य

मुंबईतील ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देण्याची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:52 PM, 8 Mar 2021
ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचं नाव दिलं जाणार, पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी मान्य

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात अनेक रस्ते मार्गांसाठी मोठ्या निधीची घोषणा अजित पवार यांनी केलीय. त्याचबरोबर मुंबईतील ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देण्याची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली होती.(Announcement of naming Eastern Freeway after former CM Vilasrao Deshmukh)

अस्लम शेख यांची मागणी मान्य करत स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं नाव आता ईस्टर्न फ्री वेला दिलं जाणार आहे. मुंबईची वाहतूक कोंडी लक्षात घेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पूर्ण मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. विलासराव देशमुख यांच्यामुळेच हा मार्ग तयार होऊ शकला, त्यामुळे या मार्गाला आता विलासरावांचं नाव दिलं जाणार आहे.

ईस्टर्न फ्री वेची वैशिष्ट्ये –

>> दक्षिण मुंबईतून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाण्यासाठी ईस्टर्न फ्री वे महत्वाचा आहे.

>> या फ्री वेची लांबी 16.8 किलोमीटर आहे.

>> दक्षिण मुंबईतील पी डीमोलो रोडपासून ते चेंबूर इथल्या पूर्व द्रुतगती मार्गाला हा जोडला जातो

>> हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे.

अजित पवारांकडून अन्य महत्वाच्या घोषणा –

समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराज महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण झालं आहे. 720 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला करण्यात येणार आहे. त्या मार्गाचा मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्याच्या विकासासाठी ‘स्टार प्रवाह’ या उद्देशाने नांदेड ते जालना मार्गाचे सात हजार कोटी रुपयांचे काम हाती घेण्यात येत आहे.

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे, मुंबई-गोवा महामार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साडे दहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गाच्या तसेच दोन किलोमीटर लांबीच्या दोन पूलांचा समावेश असलेल्या 595 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. ते डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरणारा आणि कोकणाच्या विकासाचा मार्ग विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा मार्ग असेल अशी आशा आहे.

पुणे शहरालगत चक्राकार मार्गाची उभारणी

राज्यातून तसेच राज्यातील कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक पुणे शहरात आहे. शहरातील वाहतुकीवरील त्याचा प्रचंड ताण पडतो. त्यामुळे पुण्यावरून चक्राकार मार्गाची उभारणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुमारे 170 किलोमीटर लांबीच्या 26 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल. या मार्गामुळे पुणे शहरातील वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येवर मात करता येईल.

संबंधित बातम्या :

Maharashtra Budget women : महिलांचे नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, 12 वीपर्यंत मुलींना मोफत प्रवास

Maharashtra Budget 2021 : मद्यावरील व्हॅटमध्ये 5 टक्क्यांनी वाढ, काय महाग काय स्वस्त?

Announcement of naming Eastern Freeway after former CM Vilasrao Deshmukh