AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय, अजित पवार यांचं सर्वात मोठं विधान; असं का म्हणाले?

युवा संवाद मेळाव्यातील भाषणामधून अजित दादांनी कार्यकर्त्यांना, युवा नेत्यांनाही संबोधित केलं. अनुभवाचे , उपदेशाचे चार बोल ऐकवत अजित पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना काही कानपिचक्याही दिल्या.

Ajit Pawar : चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय, अजित पवार यांचं सर्वात मोठं विधान; असं का म्हणाले?
अजित पवार भाषणImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 02, 2025 | 1:13 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर असून तेथे त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी बीडमधील स्थानिक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची भेट घेत संवाद साधला. युवा संवाद मेळाव्यातील भाषणामधून अजित दादांनी कार्यकर्त्यांना, युवा नेत्यांनाही संबोधित केलं. अनुभवाचे , उपदेशाचे चार बोल ऐकवत अजित पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना काही कानपिचक्याही दिल्या. प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी काय काय करावे याच्या मार्गदर्शक सूचनाही अजित दादांनी दिल्या. मात्र या भाषणादरम्यान त्यांनी तूफान फटकेबाजीही केली. कर्मधर्म संयोगाने, आईवडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं, असं विधान अजित पवार यांनी केलं. आपल्या यशाचे सर्व श्रेय अजितदादांनी शरद पवार यांनाच दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सुमारे 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते महायुतीत सामील झाले. या फुटीमुळे प्रचंड गदारोळ झाला, खळबळ माजली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं, आणि दोघांमधील अंतर वाढतच गेलं. लोकसभा निवडणुकीतही सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं केलं. मात्र त्यांचा पराभव झाला. काही काळापासून शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त बऱ्याचदा एका मंचावर आले होते, पण ती फक्त औपचारिकच भेट होती.  मात्र दोन्ही पक्षात पडलेली फूट, मनातील अंतर या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी अचानक हे विधान करत शरद पवारांची आठवण काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले अजित पवार ?

युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांनी तरूणांना मार्गदर्शन केलं. युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण, व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करण्यासाठी युवकांचे संघटन नीट असलं पाहिजे. काही लोक भेटले ते म्हणाले बीडमध्ये काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. त्यांनी केल्या. मला निवेदन दिलं, मी त्यांना समर्थन दिलं. अधिकारी त्यांचे काम करत आहेत,  तुम्ही तुमचे काम करा. गाव पातळीपर्यंत आपलं संघटन गेलं पाहिजे. लोकांच्या फक्त समस्या ऐकू नका, त्यांच्या चर्चांवर मार्ग काढा. त्या समस्या सोडवा, असा सल्ला अजित दादांनी दिला.

सर्वांची अंडीपिल्ली बाहेर येतात

प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी डीजिटलचा वापर करा. पण चांगल्या कामासाठी करा, असं अजित पवार म्हणाले. काही वेळा सोशल मीडियातून एखादी व्यक्ती दुसऱ्या समाजाची असेल तर दुसरा माणूस त्याला चुकीचं काही तरी बोलतो. व्हॉट्सअप पाठवतो, हे करू नका. आमचे नेते पदावर बसले आहेत. आमचं कोण काय करणार असं मनात आणू नका. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. तुम्हाला वाटत असेल मी मेसेज डीलिट केला. कोण काय करणार. पण तुमचा फोन ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही कुणाला काय व्हॉट्सअप केलं ते सर्व रेकॉर्ड समोर येतं, असं अजित पवार म्हणाले.  ते सर्व फोटो, मेसेज रिकव्हर होतात. ग्रामीण भागात सर्वांची अंडीपिल्ली बाहेर येतात. मी फार पोहोचलेलो आहे, असे विचार मनात आणू नका, असेही त्यांनी सांगितलं.

याला टायरमध्ये घ्या, ठोकून काढा

जर तुम्ही यात अडकला तर मी सोडवायला पुढे येणार नाही. मी उलट पोलिसांना सांगेन, याला टायरमध्ये घ्या. याला ठोकून काढा. हे असं नाही चालणार. मी काहींना तर मकोका लावायला सांगितलं आहे. मी दादागिरी कुणाचीच खपवून घेणार नाही. सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही नाही. ज्यांचा राजकारणाशी अर्थाअर्थी संबंध नाही, त्यांचीही दादागिरी खपवून घेणार नाही. वेगवेगळी प्रकरण बाहेर निघतात. त्याची तपासणी केली जाते, तथ्य आहे की नाही पाहिलं जाईल. उगीचच काही कुणाची बदनामी केली तर तो खपवून घेणार नाही, असा इशारा दादांनी दिला. कोणी चुकीचंच वागत असेल आणि धागेदोरे लांबपर्यंत पोहोचत असेल तर कुणालाही पाठिशी घालणार नाही. पक्षासाठी निस्वार्थी काम करा. पक्षाच्या धोरणाशी प्रामाणिकपणे राहा, असा सल्लाही अजित दादांनी दिला.

आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाही

हाराचा बोझा आहे मानगुटीवर. काही देऊ नका. कर्मधर्म संयोगाने, आईवडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं. काही देऊ नका. फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार घ्या. पायाही पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाही. ज्यांच्या पाया पडता त्याची हिस्ट्री आठवा. म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आईबापाच्या पाया पडा, गुरूच्या पाया पडा. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक ही आभाळा एवढी माणसं होती. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. छत्रपती शिवाजी महाराज आहे. संभाजी महाराज आहे. राजमाता जिजाऊ, बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा फुले आहेत. मौलाना आझाद आहे, अण्णा भाऊ साठे आहेत. युगपुरुष होऊन गेले. किती महिला. किती जणांची नावे घेऊ. वाईट वाटू नका. महापुरुषांच्या पाया पडा. पण उगाचच कोणत्याही नेत्याच्या पाया पडू नका. ही लाचारी पत्करल्यासारखं होतं. का पाया पडायचं? राम राम म्हणायच. नमस्कार करा. सलामवालेकूम म्हणा. काय हरकत आहे. आपण सर्व जाती धर्माचा आदर केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.