AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : अजित पवारांनी निधीचं असं केलं तसं केलं, एकनाथ शिंदेंच्या थेट आरोपावर दादांचं सकारण स्पष्टीकरण

कुणी चॅनेलवर निधीबाबत बोलण्यापेक्षा मला सांगितलं असतं तर समज गैरसमज दूर झाले असते. तिघांची आघाडी आहे. ही आघाडी कशी टिकेल परिस्थिती कशी हाताळेल यावर आमचा भर आहे.

Ajit Pawar : अजित पवारांनी निधीचं असं केलं तसं केलं, एकनाथ शिंदेंच्या थेट आरोपावर दादांचं सकारण स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9
| Updated on: Jun 23, 2022 | 7:17 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेऊन बंडखोरी केली आहे. तर त्यांनी आपल्या सोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे 42 आमदार सोबत घेतले आहेत. तसेच ही बंडखोरी करण्याचे कारण सांगताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) आमच्या आमदारांची घुसमट होत होती. आमची हिदुत्वाची भूमिकेला तेथे मांडता येत नव्हते असे म्हटलं होतं. तसेच सगळ्यात मोठ कारण सांगताना शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला होता. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे निधी देताना दुजाभाव करतात असा आरोप केला होता. त्यावर आता पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, शिंदेंनी निधी बाबत का आरोप केला हे माहित नाही. शिंदे म्हणतात अजित वपारांनी निधीचं असं केलं तसं केलं, मी असं काहीही केलं नाही हे सगळ्यांनाच माहित आहे.

समज गैरसमज दूर झाले असते

महाराष्ट्रासह देशातल्या राजकारणात शिंदे यांनी भूकंप उडवून दिला आहे. गेली चार दिवस हे सत्तेची नाराजी नाट्य सुरू असून शिंदे हे मुंबई टू गोवाहटी व्हाया सुरत प्रवास करत आहेत. ते आपल्या सोबत शिवसेनेचे नाराज आमदार आणि काही अपक्षांना घेथलं आहे. तसेच याचं कारण सांगताना शिंदे यांनी या बंडखोरीचं खापर अजित पवार यांच्यावर फोडलं. तसेच ते निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचे म्हटलं होतं. त्यावर आज अजित पवार यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, निधी वाटपावरून माझ्यावर आरोप केले जात आहेत. तर कुणी चॅनेलवर निधीबाबत बोलण्यापेक्षा मला सांगितलं असतं तर समज गैरसमज दूर झाले असते. तिघांची आघाडी आहे. ही आघाडी कशी टिकेल परिस्थिती कशी हाताळेल यावर आमचा भर आहे.

विकासाची माझी भूमिका

तसेच आमची भूमिका ही आघाडी सरकार टिकवण्याची आहे. सर्व आमदार आमच्यासोबत आहे. काही आमच्या पक्षातील मित्रं पक्ष आहेत. जे काही वेगळं स्टेटमेंट करत आहे. निधीचं असं केलं तसं केलं. सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आलं. त्यावेळी 36 पालकमंत्री होते. प्रत्येकाचे एक तृतियांश होते. निधी देत असताना कुठेही काटछाट केलेली नाही. अर्थसंकल्पातील निधी दिला. डीपीसीचा निधी डोंगरी निधी दिला. मग दुजाभाव केला असं ते म्हणत आहेत. मी तसं काही केलं नाही. निधी हा सर्वांना समान वाटप करण्याचं काम केलं. विकासाची माझी भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले.

आमचा पूर्णपणे पाठिंबा

तसेच पवार म्हणाले, महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. हे सरकार कसं टिकेल त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आमचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली असून आदित्य ठाकरे यांच्याशीही चर्चा झाली आहे. आमची दुसरी काही भूमिका नाही. शिवसेनेतील घडामोडीबाबत शिवसेनेचे लोक बोलतील असेही पवार म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.