“सूचनांची नोंद घ्या, मी लक्ष ठेवेल, पहाटे पाचलाच येऊन बघतो,” बारामतीत अजितदादा पुन्हा एकदा ‘कर्तव्यकठोर’

मी वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल सूचना केल्या आहेत. त्याची नोंद संबंधित विभागाने घेतली असेल. आता मी त्यावर लक्ष ठेवेल. नाहीतर एखाद्या दिवशी पहाटे पाचलाच येवून बघतो. काम सुरु आहे की नाही हे चेक करतो, असे म्हणत अजित पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्याचे सूचित केले.

सूचनांची नोंद घ्या, मी लक्ष ठेवेल, पहाटे पाचलाच येऊन बघतो, बारामतीत अजितदादा पुन्हा एकदा 'कर्तव्यकठोर'
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 112 कोटींचा निधी
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 11:01 AM

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलं शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा या गोष्टी आल्याच. नियम न पाळल्यामुळे अजित पवार यांनी बड्या-बड्या अधिकाऱ्यांना फटकारल्याचे किस्से यापूर्वीदेखील चर्चेत आले आहेत. याची प्रचिती पुन्हा एकदा बारामतीमध्ये आली. मी वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल सूचना केल्या आहेत. त्याची नोंद संबंधित विभागाने घेतली असेल. आता मी त्यावर लक्ष ठेवेल. नाहीतर एखाद्या दिवशी पहाटे पाचलाच येऊन बघतो. काम सुरु आहे की नाही हे चेक करतो, असे म्हणत अजित पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्याचे सूचित केले. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात सीटी स्कॅन विभागाचे आज लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

रुग्णसेवेत कुठेही कुचराई होता कामा नये

पुढे बोलताना त्यांनी “कुणाचीही ऐपत नाही म्हणून उपचार घेता आले नाहीत, असं वाटू नये. यासाठी सर्व सुविधा बारामतीत उपलब्ध करायच्या आहेत. आरोग्य सेवेची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रुग्णसेवेत कुठेही कुचराई होता कामा नये वैद्यकीय व्यवसाय हा लोकांच्या जीवन मरणाशी संबंधित गरीब गरजू रुग्णांना मदत करा. गरीब गरजू रुग्णांना मदत करा, असेही अजित पवार म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकतरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवं

विम्याच्या माध्यमातून जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु आहे. डॉक्टरांनी पवित्र भावनेने काम करायला हवे. इथलं वातावरण पाहूनच रुग्ण निम्मा बरा झाला पाहिजे. लहान मुलांसाठी चांगली सुविधा दिलेली आहे. जगातले रुग्ण उपचारासाठी भारतात येतायत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकतरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलं पाहिजे. अनेक ठिकाणी आरोग्य सेवा नसल्याने रुग्णांची हेळसांड होते. कितीही आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या तरी निरोगी आरोग्यदायी जीवनशैली महत्वाची आहे, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले.

कोरोना आली की विकासकामांचा निधी थांबवावा लागतो

आपल्याला कोणी 14 रुपये देत नाही. आपल्याला वैद्यकीय सेवेसाठी 14 कोटी रुपये उपलब्ध झाले. व्यसनांपासून दूर रहा. दारुपासून दूर रहा. गुटखा खाऊ नका. जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथिल करत आहोत महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी देत आहोत. मास्क वापरा मी फक्त जेवताना आणि पाणी पितानाच मास्क काढतो. काल सगळीकडे गेलो तर मास्क काढला नाही. माणसाचं जीव वाचवणं हे कर्तव्य. कोरोना आला की लगेच विकासाचा निधी थांबवावा लागतो, असे म्हणत अजित पवार यांनी कोरोना नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन केले.

इतर बातम्या :

Chipi Airport : ‘मुंबई’च्या उद्धव ठाकरेंचे ‘सिंधुदुर्ग’च्या नारायण राणेंना खास ‘पुणे’री टोमणे!

‘सामना’चं नाव बदलून आता ‘बाबरनामा’ ठेवा, गोपीचंद पडळकरांची शिवसेनेवर जळजळीत टीका

VIDEO | विवाहितेचे अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, वसईत मनसे कार्यकर्त्यांचा तरुणाला बेदम चोप

(ajit pawar ordered medical officer and doctors to work properly while inauguration of ct scan department baramati)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.