VIDEO | विवाहितेचे अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, वसईत मनसे कार्यकर्त्यांचा तरुणाला बेदम चोप

तरुण मागच्या काही महिन्यांपासून विवाहित महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून तिचा पाठलाग करणे, ब्लॅकमेल करणे, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे असे प्रकार करत होता. पीडित महिला कंटाळून मुंबईहून वसई नायगाव येथे कुटुंबाच्या सोबत राहण्यासाठी आली होती.

VIDEO | विवाहितेचे अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, वसईत मनसे कार्यकर्त्यांचा तरुणाला बेदम चोप
वसईत विवाहितेला त्रास देणाऱ्या तरुणाला मनसैनिकांचा चोप


वसई : विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओडून, तिचे अश्लील व्हिडीओ काढत ब्लॅकमेल करणाऱ्या वासनांध तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईजवळच्या वसई-नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवार 8 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. मनोज थोरात असे चोप दिलेल्या तरुणाचे नाव असून तो मुंबईतील चुनाभट्टी येथील राहणारा आहे.

काय आहे प्रकरण?

तरुण मागच्या काही महिन्यांपासून विवाहित महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून तिचा पाठलाग करणे, ब्लॅकमेल करणे, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे असे प्रकार करत होता. पीडित महिला कंटाळून मुंबईहून वसई नायगाव येथे कुटुंबाच्या सोबत राहण्यासाठी आली होती. मात्र नायगावमध्ये येऊनही तिला त्रास देणे सुरुच होते.

महिलेची मनसेकडे तक्रार

अखेर, महिलेने मनसे पदाधिकारी प्रफुल कदम यांच्याकडे तक्रार केली. मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर, माजी नगरसेवक प्रफुल पाटील यांना याची माहिती देऊन, प्रफुल कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला ट्रॅप लावून पकडले. नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात त्याला पकडून बेदम चोप दिला. चोप देत त्याला वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

पाहा व्हिडीओ :

नवोदित अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी, मनसैनिकांचा निर्मात्यांना चोप

याआधी, नवोदित अभिनेत्रीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कपडे फाटेस्तोर चोपलं होतं. या प्रकरणाचे व्हिडीओ देखील समोर आले होते. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्ह करत या प्रकरणाची माहिती दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सापळा रचत ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील फार्म हाऊसवर संबंधित निर्मात्यांना घेरलं होतं. त्यानंतर त्यांना चांगलाच चोप देत तरुणीची सुटका केली होती.

संबंधित बातम्या :

VIDEO : नवोदित अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांना मनसेचा चोप

 पोलीस कॉन्स्टेबल असल्याचा माज? तरुणाला मरेपर्यंत मारलं, नंतर फेकून दिलं, मारहाणीचा व्हिडीओ समोर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI