AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित दादा म्हणाले….

पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळी एकत्र साजरी करतात. गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तरी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली होती. पण यावर्षी थोडसं चित्र वेगळं आहे. कारण खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबीय एकत्र निवडणूक लढवणार का? असा प्रश्न अजित पवारांना आज विचारण्यात आला.

पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित दादा म्हणाले....
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Oct 31, 2024 | 6:18 PM
Share

दिवाळी म्हटलं की, बारामतीत पवार कुटुंबीय एकत्रित येण्याचा क्षण असतो. मात्र आधी लोकसभा आणि आता विधानसभेत पवार कुटुंबियांत राजकीय कटुता निर्माण झालीय. त्यामुळे आता या दिवाळीत पवार कुटुंबीय एकत्रित येतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच अजित पवारांना याबाबत विचारलं असता आपल्याला दिसेलचं, असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलं. तर सुप्रिया सुळे असं म्हणताच भाऊबीजबद्दल पत्रकार विचारतील हे हेरून अजित पवारांनी काढता पाय घेतला. पुरंदरमध्ये अजित पवारांनी उमेदवार दिल्याने शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी टीका केली. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता, मला महायुतीत एकोपा ठेवायचा आहे. त्यांच्यावर इतर नेते उत्तर देतील, असं अजित पवार म्हणाले.

चिंचवडमधील तिढा सोडविण्याच्या दृष्टीने अजित पवारांनी नाना काटे यांची भेट घेतली. मात्र काटे माघार घेणार का? यावर ही 4 तारखेला चित्र स्पष्ट होईल, असं अजित पवार म्हणाले. दुसरीकडे मावळ विधानसभेत सुनील शेळकेंचा प्रचार करायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते येतील, असा दावाही अजित पवारांनी केला. मावळ पॅटर्न अडचणीचा ठरेल का? असं विचारलं असता, थोड्या दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार आणखी काय-काय म्हणाले?

“चिंचवडची जागा महायुतीत भाजपला गेली आहे. नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, म्हणून भेटायला आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. मी सांगेल तोच निर्णय घ्यावा लागेल, असं मी त्यांना सांगितलं आहे. मावळमध्येही तिढा निर्माण झालाय. याबद्दल काल चर्चा झाली आहे. अशा ठिकाणी सामंजस्य भूमिका घ्यावी लागेल. उमेदवाराने ऐकलं नाही तर काही कठोर निर्णय घेणार. यातून मार्ग काढणार”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली.

“मी महायुतीचा जबाबदार व्यक्ती आहे. प्रत्येकाच्या बद्दल बोलणार नाही. 20 तारखेपर्यंत एकोपा ठेवायचा आहे. यावर मी उत्तर देणार नाही. आम्हाला महायुतीचा सरकार आणायचं आहे”, असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांना बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “ते आपल्याला दिसेल”, अशी प्रतिक्रिया दिली.

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.