VIDEO: सरकार आणायचं म्हणून काडी टाकण्याचं काम करू नका, निधी वाटपावरून Ajit Pawar यांचा फडणवीसांना टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक निधी घेतला असून शिवसेनेला सर्वात कमी निधी दिल्याची टीका केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी आज आकडेवारीच सादर करत फडणवीसांचा हा दावा फेटाळून लावला.

VIDEO: सरकार आणायचं म्हणून काडी टाकण्याचं काम करू नका, निधी वाटपावरून Ajit Pawar यांचा फडणवीसांना टोला
निधी वाटपावरून Ajit Pawar यांचा फडणवीसांना टोलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 5:28 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) सर्वाधिक निधी घेतला असून शिवसेनेला (shivsena) सर्वात कमी निधी दिल्याची टीका केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी आज आकडेवारीच सादर करत फडणवीसांचा हा दावा फेटाळून लावला. ज्यावेळी अर्थसंकल्प तयार करतो. तेव्हा त्यावर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची त्यावर अंतिम सही असते. संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देते. कोणतंही सरकार चालवायचं म्हटलं, टिकवायचं म्हटलं, पुढे न्यायचं म्हटलं तर भेदभाव करून चालणार नाही. भेदभाव केला तर सरकार चार दिवसही चालणार नाही. त्यामुळे असा प्रयत्न शिवसेनाही करत नाही, राष्ट्रवादीही करत नाही आणि काँग्रेसही करत नाही. माझ्या खात्याकडची रक्कम वेतन आणि निवृत्तीवेतनावरही जाते. कर्जाचं व्याज भरण्यावरही जाते. हे सर्व घातलं राष्ट्रवादीच्या नावावर. असं कुठं असतं का? आशिष शेलार साहेब ठिक आहे. सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. पण असलं काही तरी सांगून कुठं तरी आगीत काडी घालण्याचं काम करू नका, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी ही आकडेवारी सादर केली. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत. त्यांनी हा मुद्दा काढला मला त्याचं आश्चर्य वाटलं. ते असा मुद्दा काढतील असं वाटलं नव्हतं. त्यांनी सांगितलं शिवसेनेला इतके लाख कोटी, राष्ट्रवादीला इतके लाख कोटी आणि काँग्रेसला इतके लाख कोटी. सरकार कुणाचंही असलं तरी असा निधी देता येत नाही. दुजाभाव करता येत नाही. एखादं डिपार्टमेंट कुणाकडे असेल तर त्या डिपार्टमेंटचे पैसे त्या राजकीय पक्षाचे वैयक्तिक नसतात. उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्याकडे अर्थ विभाग आहे. 2022-23मध्ये खर्चा करता 1 लाख 43 हजार 6 कोटी 78 लाख दाखवले. यातले कुठले कुठले पैसे आहेत. हे काही पैसे अजित पवार कुणाला देऊ शकत नाही. संपूर्ण वेतन, निवृत्ती वेतन त्यात आहे. वेतनचा खर्च 2022-23चा 12094 कोटी, तरतूद 1 लाख 43 हजार 600 कोटी, निवृत्तीवेतनाचा खर्च आहे 45 हजार 511 कोटी आहे. आणि कर्ज काढतो त्याचं व्याज 42 हजार 526 कोटी. कर्जाची परतफेड 51 हजार 956 कोटी असे 1 लाख 41 हजार 288 कोटी आहे. हे सर्व घातलं राष्ट्रवादीच्या नावावर. असं कुठं असतं का. आशिष शेलार साहेब ठिक आहे. सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. पण असलं काही तरी सांगून कुठं तरी त्यात आगीत काडी घालण्याचं काम करू नका, असं पवार म्हणाले.

आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न

वर्षभरात आर्थिक शिस्तीला फाटा दिला जातो आणि महसुली तुटीचे आकडे फसवे असून अर्थसंकल्पात दाखवलेली महसुली तूट व प्रत्यक्ष महसूली तुट यात कित्येक पटीची वाढ होते, अशा प्रकारचा आरोप झाला. परंतु आपण पाहिलं तर सुधीर मुनगंटीवारांचं जे शेवटंच वर्ष होतं त्यात 2018-19ला स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी मायनस 4.29 होती, 2019-2020 ला ती 0.63 टक्के आली. 2020-21ला 1.52 टक्के झाली. त्याचं कारण म्हणजे कोरोनाचा काळ होता. आता 1.52चा सुधार अंदाजित आम्ही 2021-22चा केला तो 0.96 आलं. 2022-23चा 0.68 टक्क्यावर आणलं. आम्ही पुन्हा कमी आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आर्थिक शिस्त लावण्यासाठीच हे केलं, असं त्यांनी सांगितलं.

येड पांघरूण पेडगावला जायचं होतं

इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टीका करत होते असा टोलाही त्यांनी लगावला.

विकासाला खिळ बसणार नाही

अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी ‘सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाची बरे, या संत तुकारामांच्या अभंगाने सुरुवात केली. राज्य अडचणीतून पुढे जात असताना राज्याला कर्जातून बाहेर काढताना महसूली तुट कशी कमी करता येईल, नागरीकांवर कराचा भार पडता कामा नये व राज्याचा गाडा सुरळीत चालेल, विकासाला खीळ बसणार नाही असा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Breaking : प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा दिलासा नाही, मजूर प्रकरणात दाखल याचिका फेटाळली

मुंबईतील एसी लोकलचे तिकीट दर कमी करा; शिवसेना खासदारांची लोकसभेत मागणी

Nashik News | नाशिकमध्ये दोन अपघातात 1 ठार; 2 गंभीर जखमी, treatment सुरू

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.