बारामती ‘साहेबा’नंतर आता ‘दादां’च्या सोबत? अजित पवार यांनी उदाहरणासह दाखवले

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना माझ्याविरोधात माझ्या पुतण्यास उभे केले. त्यावेळी मी माझ्या भावाला निरोप पाठवला, माझ्याविरोधात त्या पोराला नको पोराला उभे करू, तेव्हा त्याने ऐकले नाही.

बारामती 'साहेबा'नंतर आता 'दादां'च्या सोबत? अजित पवार यांनी उदाहरणासह दाखवले
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 1:50 PM

राज्यातील राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणात बारामतीचे महत्व आहे. वर्षनुवर्ष पवार कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघावर पवार कुटुंबामध्येच वर्चस्वाची लढाई सुरु आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बारामतीकर कोणासोबत आहे? याचे उत्तर लोकसभेला वेगळे आणि विधानसभेला वेगळे मिळाले. आता अजित पवार यांनी बारामती आपल्या पाठिशी असल्याचा दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. लाडकी बहीण योजनेमुळे मी म्हणणाऱ्यांना घरी बसावे लागले. राज्यात आजपर्यंत सर्वात जास्त जागा महायुतीला मिळाल्या आहेत.

नेमके काय म्हणाले अजितदादा?

पुणे जिल्ह्यातील लिंगाळी विविध विकास सोसायटीचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना माझ्याविरोधात माझ्या पुतण्यास उभे केले. त्यावेळी मी माझ्या भावाला निरोप पाठवला, माझ्याविरोधात त्या पोराला नको पोराला उभे करू, तेव्हा त्याने ऐकले नाही. तो म्हणाला, साहेबाच्या मागे बारामती आहे. परंतु त्याला काय माहीत साहेबांच्या नंतर बारामती दादांच्या मागे उभी आहे. त्यावेळी माझ्या विरोधात सर्व खानदान प्रचारात उतरले होते. मी मात्र शांत राहिलो. बारामती माझ्या पाठिशीच राहिली.

हे सुद्धा वाचा

लाडकी बहीण योजना सुरुच राहणार

अजित पवार म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही. विरोधक सांगत होते, 1500 रुपयांमध्ये काय होणार? परंतु चांगल्या योजना आणल्यावर काय होते, ते विरोधकांनी पाहिले आहे. आता आम्हाला दृष्ट लागू नये म्हणून आम्ही काळी बाहुली देवगिरीला बांधणार आहोत.

बीड प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, बीडचे प्रकरण आम्ही गंभीरपणे घेतले आहे. त्यावर एसआयटी नेमली आहे. त्या प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत गेले तरी माफ करणार नाही. अजित पवार यांनी यावेळी शिरुरचा उल्लेख केला. त्यांनी अशोक पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, शिरूर तालुक्यात सांगितले आमच्याकडे या. परंतु ऐकलं नाही. माऊली कटके यांनी त्यांचा 75 हजार मतांनी पराभव केला.

'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.