Ajit Pawar | नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची डरकाळी; म्हणाले, फार विचारपूर्वक मतदान करा
कुणाच्याही दहशतीला दबावाला बळी पडू नका. अत्यंत विचार पूर्वक मतदान करा. आरोप प्रत्यारोप करण्यात मला स्वारस्य नाही. आणि मला कसलाही फायदा उठवायचा नाही

सिंधुदुर्ग – कोकणी माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो, हा इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्याही दहशतीला, दबावाला बळी पडू नका. अत्यंत विचारपूर्वक मतदान करा. आरोप-प्रत्यारोप करण्यात मला स्वारस्य नाही. आणि मला कसलाही फायदा उठवायचा नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग येथे डीपीडीसी बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी गेले असता ते बोलत होते.
महाविकास आघाडीच्या पॅनलला मतदान करण्याचे आवाहन ज्या-ज्या जिल्ह्यात लोकांनी जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या लोकांच्या हातात दिल्या त्या बँका सुस्थितीत आहेत. मात्र ज्या बँका चांगल्या लोकांच्या हात गेल्या नाहीत त्या अडचणीत आलेल्या आहेत. हे मी नावानिशी तुम्हाला सांगितले आहे. मराठवाड्यात लातूर बँक चांगली चालली आहे. नाहीतर उस्मानाबाद बँक अडचणीत आहेत. त्यानंतर बीडमधील बँकही अजून म्हणावी अशी चालली नाही. नांदेड जिल्हा बँकही व्यवस्थित नाही, हिंगोली आणि परभणी बँक एकच आहे. तसेच औरंगाबाद ठीक चाललेली आहे. जालना एक ठीक चालली आहे.
ज्या काही बँका चांगल्या चाललया आहेत, त्यात तुमच्या माझ्या कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक उत्तम चालल्या आहेत. अशाप्रकारे या बँका चांगल्या चालण्यासाठी आपले बहुमोल असं मत द्या. दोन महिलां मतदान करण्याचा , अनुसूचित जातीजमातीमागास प्रवर्ग, ओबीसी , एनटीला मतदान करण्याचा अधिकार आहे. सतीश सावंत स्वतंत्रपणे उभे आहेत, अश्या प्रकारे महाविकास आघाडीच्या पॅनलला मतदान करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
नारायण राणेंना हाणला टोला
अजित पवार म्हणाले की, बँक ही त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून ओळखली जाते. खरे तर इथे पीक कर्ज इथे कमी दिलं जातं. मात्र, आमच्याकडं हजारो कोटी दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार म्हणाले की, पूर्वी सतीश सावंत यांच्या मागे असणारी मंडळी काय काय काम सांगायची. तसं नसतं, बँक ही बँक असते, असे म्हणत त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला हाणला. शिवाय फार विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ज्योतिष टिप्स: नोकरी मिळण्यात अडचणी येत आहे? मग हे खास उपाय करून पाहा!
Devendra Fadnavis | विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत राज्यपाल निर्णय घेतील : देवेंद्र फडणवीस
Nashik | 153 दिवसांचे आंदोलन अन् साध्य काय झाले आंदोलनकर्त्यांचे निलंबन, काय आहे नेमका प्रकार ?
