AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : तुझी इतकी हिंमत, मी अ‍ॅक्शन घेईन… महिला अधिकाऱ्यावर अजित पवार भडकले, VIDEO व्हायरल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात ते सोलापूरच्या माढा तालुक्यातील उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना बेकायदेशीर खडी उत्खनन थांबवण्याचे आदेश देत होते. पोलिस अधिकाऱ्यातर्फे कारवाई केल्यावर अजित पवार यांनी तिला फोन करत कारवाई रोखण्याचा आदेश दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Ajit Pawar : तुझी इतकी हिंमत, मी अ‍ॅक्शन घेईन... महिला अधिकाऱ्यावर अजित पवार भडकले, VIDEO व्हायरल
अजित पवार भडकले
| Updated on: Sep 05, 2025 | 11:12 AM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या थेट, बेधडक विधानांसाठी आणि शिस्तप्रिय नेते म्हणून प्रसिद्ध आहे. याच अजित पवारांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवार आणि सोलापूरच्या माढा तालुक्याती डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांच्यात झालेली बातचीत व्हिडीओत कैद झाली असून तोच व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे त्या महिला पोलिस अधिकाऱ्याला खडी उत्खनन तात्काळ थांबवण्यास सांगत आहेत. आदेशांचे पालन न केल्याबद्दल कारवाई करू असे ते धमकीच्या स्वरात बोलतानाही दिसले. 1 सप्टेंबरची ही घटना असल्याचे सांगितले जाते.

नेमकं काय झालं ?

खरंतर सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये मुरूम उपसा होत असल्याची तक्रार समोर आली. तहसील अधिकारी आणि डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांना ही तक्रार मिळताच, पोलील दल घेऊन त्या कारवाई करण्यासाठी तेथे पोहोचल्या. प्रशासनाची कारवाई सुरू असताना, राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ता बाबा जगताप यांनी त्यांच्या फोनवरून थेट अजित पवारांना फोनल करत त्यांचं अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अंजली कृष्णा यांनी अजित पवारांशी संवाद साधला.

त्या फोनवर अजित पवार म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय, तुम्ही तुमची कारवाई थांबवा आणि तिथून निघून जा, असे आदेश त्यांनी दिले. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन केला होता असे तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा. मुंबईतील वातावरण खराब आहे आणि आपल्याला तिथे प्राधान्य द्यावे लागेल. मी तुम्हाला कारवाई तात्काळ थांबवण्याचा आदेश देतो, असे त्यांनी सांगितलं.

तुमच्यावर अ‍ॅक्शन घेईन

मात्र त्या बोलण्यादरम्यान पोलिस उपअधीक्षक अंजना कृष्णा म्हणाल्या की मला कसं कळणार की तुम्हीच बोलत आहात. असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना व्हिडिओ कॉल करून त्यांची ओळख पटवण्याची, पडताळणी करण्याची मगाणी केली. ते ऐकून अजित दादा भडकले. तुम्ही मला कॉल करायला सांगताय ? तुमच्यावर अ‍ॅक्शन घेईन अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

त्यावर अंजली कृष्णा म्हणाल्या की मी तुमचं बोलणं समजू कते. त्यानंतर अंजली यांनी नंबर दिल्यावर अजित पवार यांनी त्या नंबरवर व्हिडीओ कॉल केला. माझा चेहरा तर तुम्ही ओळखत असाल ना, तुमची डेअरिंग खूपच वाढली आहे,असंही अजिपवारांनी सुनावलं. फोनवर बोलताना अजित पवारांनी डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांना कारवाई थांबवून तेथून निघून जाण्यास सांगितलं.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

कोण आहे अंजली कृष्णा ?

सोलापूर जिल्ह्यात तैनात असलेल्या आयपीएस अंजना कृष्णा सध्या करमाळा तहसीलच्या डीएसपी आहेत. अंजना कृष्णा 2023 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या फक्त 2 वर्षांपासून ड्युटीवर आहेत. त्या केरळमधील तिरुवनंतपुरम येथील आहेत. त्यांचे वडील तिथे एक लहान कपड्याचे दुकान चालवतात, तर आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करते. त्यांनी शालेय शिक्षण पूजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून पूर्ण केले आणि नीरमंकारा येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमन येथून बीएससी गणितात पदवी प्राप्त केली. त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२२ मध्ये एआयआर-३५५ रँक मिळवला. अंजली या प्रामाणिकपणा, दृढनिश्चय आणि कुशाग्र प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखली जाते.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.