मोठी बातमी! महायुतीमध्ये नाट्यमय घडामोडी, एकनाथ शिंदें मोठ्या पेचात, काय निर्णय घेणार?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आता एकनाथ शिंदे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच आता घडामोडींना वेग आला असून महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. जिथे -जिथे विरोधकांना फायदा होईल, तिथे -तिथे आम्ही महायुती म्हणून लढणार असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पहाता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. मुंबई महापालिकेची निवडणुक तीन्ही पक्ष मिळून महायुतीमध्ये लढणार आहेत, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर मात्र मोठा पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात युती करण्याबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. ठाण्यात युती झाल्यास जागा वाटपावेळी भाजपला ठाण्यातील काही जागा मिळाल्यास शिवसेना शिंदे गटाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार पुन्हा शिवसेना ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच युतीबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेणार? ठाणे महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार ? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही नेत्यांकडून देखील स्वबळाचा नारा देण्यात येत आहे, त्यामुळे आता या निवडणुकीबात उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.
