AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचं मंत्रालय बंद, दुकानदारी सुरू, महत्त्वाचे मंत्रीच भ्रष्टाचाराने बरबटलेले, पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र सरकारमधले मंत्रीच भ्रष्टाचाराच्या आरोपाने बरबटलेले आहेत. त्यांच्याकडून जनतेने काय अपेक्षा करावी, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. मुंबई येथील एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

सरकारचं मंत्रालय बंद, दुकानदारी सुरू, महत्त्वाचे मंत्रीच भ्रष्टाचाराने बरबटलेले, पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 1:07 PM
Share

मुंबईः भाजपने (BJP) सुरु केलेल्या अनेक विकासाच्या योजना (Development Scheme) सध्याच्या राज्य सरकारने बंद पाडल्या आहेत. सरकारचं मंत्रालय बंद असून दुकानदारी तेवढी सुरु आहे, असा शाब्दिक हल्ला भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला. मुंबईत भाजप पक्ष कार्यालयात (BJP Office, Mumbai) त्या बोलत होत्या.

सरकारला अहंकार, एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अहंकार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, संपूर्ण दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. पण या सरकारला अहंकार आहे. त्यांना कर्मचाऱ्यांचं उपोषण, त्यांची आंदोलनं दिसून येत नाहीत. आम्ही अनेक ठिकाणच्या आंदोलनाला भेट दिली. सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा चर्चेचा सूरच नकारात्मक आहे. चर्चेतून हा मुद्दा सोडवता येऊ शकतो, पण सरकार या सकारात्मक विचार करत नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

सरकारमध्ये फक्त दुकानदारी सुरु- पंकजा मुंडे

सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने सरकार चालवण्याऐवजी दुकानदारी चालवायचं ठरवलंय, असं चित्र असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली. भाजपने हाती घेतलेली मराठवाड्यातील वॉटरग्रिड योजना सरकारने बंद पाडली. जलयुक्त शिवार बंद केली. त्यामुळे सरकारचं मंत्रालय बंद आणि दुकानदारी सुरु आहे, असं वाटतंय. राज्यातील मुख्यमंत्री पदानंतर असलेल्या महत्त्वाच्या पदांवरील मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात बरबटलेले आहेत. गृहमंत्र्यांनीच एवढा भ्रष्टाचार केला असेल तर जनतेनेही या सरकारकडून कोणत्या तोंडाने अपेक्षा करावी, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

इतर बातम्या-

अमरावती दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी; सरकार नागपूरला अधिवेशन घ्यायला घाबरले, असा हल्लाबोल

भीषण अपघात! भरधाव कार तीन वेळा पलटली, ओढ्यात कोसळली, एअरबॅगमुळे वाचले चौघांचे प्राण, औरंगाबादची घटना

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.