AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded मध्ये विद्युत सहाय्यक भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप, नियमानुसार जागा भराव्या उमेदवारांची मागणी

महावितरण कंपनी (MSEDCL) मार्फत घेण्यात आलेल्या विद्युत सहाय्यक भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप नांदेड (Nanded) मधील उमेदवारांनी केला आहे. 2019 मध्ये विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) पदाच्या पाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत जवळपास अडीच हजार जागा भरण्यात आल्या आहेत.

Nanded मध्ये विद्युत सहाय्यक भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप, नियमानुसार जागा भराव्या उमेदवारांची मागणी
नियमानुसार जागा भराव्या उमेदवारांची मागणीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 6:58 AM
Share

नांदेड – महावितरण कंपनी (MSEDCL) मार्फत घेण्यात आलेल्या विद्युत सहाय्यक भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप नांदेड (Nanded) मधील उमेदवारांनी केला आहे. 2019 मध्ये विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) पदाच्या पाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत जवळपास अडीच हजार जागा भरण्यात आल्या आहेत. उर्वरित अडीच हजार जागा तरी नियमानुसार भरण्यात याव्या अशी मागणी उमेदवारानी केली आहे. उमेदवारांचे बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण गृहीत न धरता. एकूण गुण गृहीत धरण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. त्यावेळी जवळपास सव्वा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवडीची पहिली यादी लावण्यात आली, त्यात काही उमेदवारांच्या बाबतीत गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही पात्र विद्यार्थ्यांचे बेस्ट ऑफ 6 ऐवजी बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण ग्राह्य धरण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

काही विद्यार्थ्यांनी 2021 चे शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र लावले. त्यांचीही निवड करण्यात आली आहे. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा 10 % आरक्षित कोटा भरण्यात आला नाही. धक्कादायक बाब म्हणजे निवड यादी लावण्यापूर्वी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. तसेच प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त, माजी सैनिक उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप या उमेदवारानी केला आहे. त्यामुळे विद्यार्थी न्याय मागत आहेत. त्याचबरोबर आतातरी किमान उरलेली पदं नियमानुसार भरा अशी मागणी करीत आहेत. झालेल्या घोटाळ्याची सरकार दरबारी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच पुन्हा परीक्षा घ्याव्यात अशी उमेदवारांची मागणी आहे.

पात्र उमेदवारांना डावलले

नांदेडच्या महावितरण कंपनीत पाच हजार जागा भरायच्या होत्या. त्यापैकी अधिकाऱ्यांनी आपल्या मनमर्जीने अडिच हजार पदे भरली आहेत. जाहीरातीत दिल्याप्रमाणे कोणतीही नियमावली अधिकाऱ्यांनी पाळली नसल्याची उमेदवारांनी तक्रार केली आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी उमेदवारांची इच्छा आहे. तसेच उर्वरित अडीच हजार पदं तरी किमान नियमानुसार भरावी अशी उमेदवारांची मागणी आहे.

Nagpur Temperature | एप्रिल आलाय उन्हाचे चटके आणखी वाढणार; विदर्भातील तापमान 45 पर्यंत जाणार

आज होणार देवीच्या ‘कुष्मांडा’ अवताराचा जागर, जाणून घ्या पूजेची वेळ आणि सर्व काही एका क्लिकवर

National Maritime Day : व्यापाराला नवसंजीवनी देणारा दिवस, राष्ट्रीय नौकानयन दिनाचा जाणून घ्या इतिहास?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.