AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे यूपी, बिहारमध्ये नाही, महाराष्ट्रात घडलं! नवरा दारु पिऊन आला, पत्नीने नको तिकडे मारलं अन्…; अंबाजोगाईतील खळबळजनक घटना

अंबाजोगाईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती दारु पिऊन घरी आल्यामुळे पत्नीला राग आला. तिने रागाच्या भरात त्याला बेदम मारहाण केली. दरम्यान नको तिकडे मार लागल्यामुळे जे घडलं अख्ख अंबाजोगाईतील खळबळ माजली. नेमकं काय घडलं जाणून घ्या...

हे यूपी, बिहारमध्ये नाही, महाराष्ट्रात घडलं! नवरा दारु पिऊन आला, पत्नीने नको तिकडे मारलं अन्...; अंबाजोगाईतील खळबळजनक घटना
AmbajogaiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 13, 2025 | 11:48 AM
Share

हे यूपी, बिहारमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. पण आजकाल आपल्या राज्यात देखील दिवसेंदिवस गुन्हे वाढत चालले आहेत. पत्नी आणि पतीमधील वाद तर आता इतके टोकाला जाऊ लागले आहेत की त्याचा शेवट फार वाईट होताना दिसत आहे. असेच काहीसे अंबाजोगाईमध्ये घडले आहे. पती दारू पिऊन घरी आला. त्यानंतर पती आणि पत्नीमध्ये चांगलाच वाद झाला. पत्नीने रागाच्या भरात पतीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पण नको तिकडे मार लागल्यामुळे जे घडले त्यामुळे संपूर्ण अंबाजोगाईमध्ये खळबळ माजली. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…

नेमकं काय घडलं?

ही घटना अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात घडली. कैलास हा दारू पिऊन घरी आल्यावर त्याचे पत्नी मायासोबत वाद झाले. मायाने संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरच्यांनी व शेजाऱ्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता मायाने हस्तक्षेप करू नका, दररोज हा दारु पिवुन असाच करतो मी याला फुकट सांभाळायचे का? असे म्हणत त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने कैलास घराशेजारी बेशुद्ध पडलेला दिसला.

वाचा: गोरेगावमधील धक्कादायक प्रकार! आईला आवडला लेकीची BF, घरात चोरी झाली अन्… नेमकं प्रकरण काय?

डॉक्टरांनी मृत घोषित केले

नातेवाईकांनी त्याला ऑटोरिक्षाने सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरुवातीला मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाला असा समज होता. मात्र दुसऱ्या दिवशी 11 सप्टेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू मारहाणीत अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतींमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. कैलासची बहिण ज्योती तरकसेने पोलिसात जाऊन वहिनीविरोधात तक्रार दाखल केली.

सात वर्षांपूर्वी झाले होते लग्न

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, कैलास सरवदे याचे लग्न सात वर्षांपूर्वी माया हिच्याशी झाले होते. माया हिचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पतीपासून तिला दोन मुली तर कैलासपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कैलास हा शरीराने अपंग आणि दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याच्यात व माया यांच्यात नेहमी वाद होत असत. माया ही कैलास याला नेहमी उपाशी ठेवत असे. कैलास याची पत्नी माया सरवदे हिने जाणूनबुजून पतीवर घातक मारहाण करून त्याचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीतून करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माया सरवदे हिच्यावर बीएनएस कलम 105 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.