AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित ठाकरे कॉलेजसमोरील टपरीवर गेले, दिसलं असं काही की… पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?

Amit Thackeray : वाडिया कॉलेजबाहेर असलेल्या टपरीवर परवानगी नसलेल्या पदार्थांची विक्री होत असल्याची तक्रार आल्यानंतर अमित ठाकरे यांनी या टपरीची पाहणी केली.

अमित ठाकरे कॉलेजसमोरील टपरीवर गेले, दिसलं असं काही की... पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?
Amit Thackeray Pune tapri visitImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 31, 2026 | 7:00 PM
Share

मनसेचे नेते अमित ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पुण्यातील विविध ठिकाणी भेट दिली. खासकरून वाडिया कॉलेजबाहेर असलेल्या टपरीवर परवानगी नसलेल्या पदार्थांची विक्री होत असल्याची तक्रार आल्यानंतर अमित ठाकरे यांनी या टपरीची पाहणी केली. यावेळी अमित ठाकरे यांनी काही संशयास्पद पदार्थ आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कॉलेजसमोर भर दिवसा नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमित ठाकरेंना टपरीवर नेमकं काय आढळलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तक्रारीनंतर अमित ठाकरेंची टपरीला भेट

अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी वाडिया काँलेजसमोरील टपरीला भेट दिली. काही लोकांनी या टपरीवर गुटखा आणि सिगारेट विकली जाते अशी तक्रार केली होती. अमित ठाकरे यांनी या ठिकाणी भेट देताच टपरीवर विक्रीसाठी बंदी असलेले पदार्थ विकले जात असल्याचं आढळलं. याबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी सांगितले की, मी वाडिया कॉलेजकडे आलो होतो. त्यानंतर मी या टपरीला भेट दिली. या ठिकाणी तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि गांजाचे रोल आढळून आले. विक्रेता फुकत बसला होता. आम्ही आल्यावर सिगारेट विझवली.’

सरकार काय करत आहे?

पुढे बोलताना अमित ठाकरे यांनी म्हटले की, ‘या सर्वांवर कारवाई होणार आहे. आम्ही पोलिसांकडून कारवाई करून घेणार आहोत. आम्ही याबाबत त्यांना जाऊन पत्रही देणार आहोत. हे बंद झालं पाहिजे. सरकार काय करतयं? पुणे पोलिसांवर दबाव कुणाचा आहे? हे मुख्यमंत्री साहेबांना माहिती नाही का कुठून ड्रग्स येत आहेत? का येत आहेत आणि कोण आणत आहेत? ही सगळी माहिती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे हे का थांबत नाही?’ असा प्रश्नही अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल

अमित ठाकरे यांच्यावर आज पुण्यातील महाविद्यालय मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अमित ठाकरे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. विनापरवानगी महाविद्यालयात घुसल्याने चतुश्रुंगी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी