AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई, तुला जेलमध्ये का टाकलं होतं? मुलं विचारत होते, Video नवनीत राणा भावूक… जय जय श्रीरामच्या घोषणा

Navneet rana Emotional | एरवी उद्धव ठाकरे यांना आक्रमक होत इशारा देणाऱ्या नवनीत राणा आज अमरावतीत भाषण करताना भावूक झाल्या. महाविकास आघाडी सरकारमधील जेलच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

आई, तुला जेलमध्ये का टाकलं होतं? मुलं विचारत होते, Video नवनीत राणा भावूक... जय जय श्रीरामच्या घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 06, 2023 | 4:46 PM
Share

स्वप्निल उमप, अमरावती : रामाचं, हनुमानाचं  नाव घेते म्हणून मला  14 दिवसच काय 14 वर्ष जरी जेलमध्ये टाकलं असतं तर नवनीत राणा (Navneet Rana), रवी राणा (Ravi Rana) राहिले असते. तुरुंगवास भोगला असता. पण कोर्टात हजर झाले तेव्हा कळलं आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय, हे धक्कादायक होतं. माझ्यासारख्या महिला प्रतिनिधीला तुरुंगात पाणीसुद्धा दिलं नाही. मी शंभरवेळा आवाज दिले तेव्हा एकदा ऐकलं जायचं… मला आणखी एक महिना तुरुंगात ठेवण्याचा त्यांचा प्लॅन होता.. माझी लहान मुलंही विचारत होती, आई तुला जेलमध्ये का टाकलं?… खासदार नवनीत राणा भावूक झाल्या. बोलता बोलता भावना उचंबळून आल्या. हातात माईक, पण शब्द थांबले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समोर हजारो भाविक, कार्यकर्ते. अखेर आवंढा गिळला. स्टेजकडे पाठ फिरवली. अश्रू पुसले आणि पुढील भाषण सुरु केलं..

प्रसंग होता नवनीत राणा यांनी अमरावतीत आय़ोजित केलेल्या हनुमान चालिसा पठन कार्यक्रमाचा. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याने आज हनुमान जयंतनिमित्त अमरावतीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं. हजारो भाविकांनी एकत्र येऊन या कार्यक्रमात २१ वेळा हनुमान चालिसाचं पठन केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवनीत राणा यांनी हनुमान चालिसासाठी केलेल्या आंदोलनाच्या आठवणी नवनीत राणा यांनी सांगितल्या. या कार्यक्रमात स्टेजवर बोलताना मुलांनी विचारलेल्या प्रश्नावरून त्या भावूक झाल्या.

Navneet Rana

नवनीत राणा यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अखेर स्टेजकडे पाठ करून त्यांनी डोळे पुसले. सभागृहात जय जय श्रीरामच्या घोषणा सुरु झाल्या… अन् पुढचं भाषण सुरु झालं…

त्या पुढे म्हणाल्या, मी लढण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवलं होतं. माझा विश्वास ते तोडू शकले नाहीत. खूप अत्याचार केले. प्रत्येक दिवशी मी 101 वेळा हनुमान चालिसा पठन केलं. माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, ही प्रार्थना करत होते. तिथेच मी प्रण केला, बाहेर आल्यावर १११ फुटाची हनुमानाची मूर्ती उभी करेन. उद्धव ठाकरे, तुम्ही सोन्याचं ताट वापरत असाल तर गरीबांचा देवावरचा विश्वास जास्त आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या पाठिशी देवाचा आशीर्वाद आहे, ते मी त्यांना करून दाखवलं, अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं…

अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या पुढाकारातून 111 फूट उंच हनुमानाची मूर्ती उभारली जात आहे. आज हनुमान जयंती आणि नवनीत राणा यांचा वाढदिवस या दोन्हीचं मुहूर्त साधून हनुमान चालिसा पठनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....