AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमगावतीच्या ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचणार, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन 2024 पर्यंत, वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील महत्वाच्या योजनांसाठी निधीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेडोपाडी पाणीपुरवठा योजना निर्माण होण्यास वेग मिळणार आहे.

अमगावतीच्या ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचणार, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा
यशेमती ठाकूर, महिला व बालकल्याण मंत्री
| Edited By: sagar joshi | Updated on: Jan 11, 2022 | 7:53 PM
Share

अमरावती : जलजीवन मिशन (Jaljivan Mission) अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण ठरणा-या विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या (Water Supply Scheme) कामांसाठी 300 कोटींहून अधिक निधीला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याद्वारे प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, अभियान स्वरूपात ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केले.

जिल्ह्यातील प्रस्तावित ग्रामीण पाणीपुरवठ्यांच्या कामांना मान्यता मिळावी यासाठी पालकमंत्र्यांकडून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा होत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत घरोघर नळजोडणीसाठी आवश्यक निधीसाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन व चर्चेद्वारे पाठपुरावा केला. त्यानुसार महत्वाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी 300 कोटी 62 लाख रूपये निधीला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

‘जिल्ह्यातील महत्वाच्या योजनांसाठी निधीला मान्यता’

जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन 2024 पर्यंत, वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील महत्वाच्या योजनांसाठी निधीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेडोपाडी पाणीपुरवठा योजना निर्माण होण्यास वेग मिळणार आहे. आता प्रशासनानेही योजनेनुसार प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी अभियान स्वरूपात काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

ग्रामीण भागातील महत्वपूर्ण योजना

156 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत अंजनगाव सुर्जी, दर्यापूर व भातकुली तालुक्यांतील 144 गावांतील यंत्रणेचे बळकटीकरण व सुधारणांसह दरडोई दरदिवशी 55 लीटर पाणी क्षमतेच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या 23 कोटी 68 लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील 105 गावे वाढीव पाणीपुरवठा योजनेत 55 लीटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या 158 कोटी 31 लाख रूपये निधीस मान्यता देण्यात आली आहे.

चांदूर बाजार तालुक्यातील 19 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या 20 कोटी 32 लाख रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे. बागलिंगा प्रकल्पावरून चिखलदरा तालुक्यातील १४ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी 18 कोटी 58 लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अमरावती तालुक्यातील नांदगावपेठ व 32 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस 81कोटी 73 लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

प्रत्येक घरास नळजोडणी देणे आवश्यक

ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत होणार आहेत. या योजनेतून प्रत्येक घरास नळजोडणी देणे आवश्यक आहे. आतापर्यंत दिलेली नळजोडणी व पुढे द्यावयाच्या जोडण्यांबाबत आयएमआयएस प्रणालीवर माहिती नोंदविणे आवश्यक राहील. नवीन जोडणीचे आवश्यक नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची असेल. योजना स्वयंनिर्भर होण्यासाठी आवश्यक पाणीपट्टी निश्चित करणे व त्यात आवश्यकतेनुसार वाढ करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे.

जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीकरिता योजनेच्या किमतीच्या 10 टक्के रक्कम लोकवर्गणीच्या स्वरूपात ग्रामपंचायतीकडे ठेवणे आवश्यक आहे. ही रक्कम जमा करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेची राहील.

इतर बातम्या :

Goa Assembly Election 2022 : ‘गोव्यात शिवसेनेची लढाई ही नोटासोबत, डिपॉझिट वाचवण्यासाठी’, देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला

ITR Filing : आयटी रिटर्न फाईल करायचा राहिला? मग लवकर करा, डेडलाईन 15 मार्चपर्यंत वाढवली

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली