AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमरावतीत 100 पेक्षा जास्त महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?

अमरावतीच्या नांदगाव पेठ येथील गोल्डन फायबर कंपनीत 100 पेक्षा जास्त महिलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. सर्व महिलांना अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महिलांना पाणी किंवा नाश्त्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोठी बातमी! अमरावतीत 100 पेक्षा जास्त महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 पेक्षा जास्त महिलांना विषबाधा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 12, 2025 | 4:15 PM
Share

अमरावतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. अमरावतीत 100 पेक्षा जास्त महिलांना विषबाधा झाली आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीत ही घटना घडली आहे. सर्व महिलांवर अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे अमरावतीत काही दिवसांपूर्वी एका शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीत महिलांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना अतिशय चिंताजनक आणि धक्कादायक आहे. कारण 100 पेक्षा जास्त महिलांना ही विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही महिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कंपनीतील पाणीतून किंवा नाश्तामधून ही विषबाधा झाल्याचा संशय आहे.

महिलांनी सांगितला घटनाक्रम

एका महिलेने सांगितलं की, “मला आज सकाळपासून त्रास होतोय. पाणी पिल्यापासून त्रास होतोय. सकाळपासून मळमळ होत आहे. तसेच उल्टी झाली आणि खूप पोट दुखत आहे.” दुसऱ्या एका महिलेने आपल्या कंपनीत जवळपास 700 महिला काम करत असल्याची माहिती दिली. दरम्यान, अनेक महिलांची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना रुग्णालयात आणलं

विशेष म्हणजे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना रुग्णालयात आणलं आहे. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “एकदम गंभीर घटना आहे. महिलांना सकाळी ९ वाजेपासून जेव्हा त्रास सुरु झाला, तर प्रत्यक्ष कंपनीने कुणाला बाहेर येऊ दिलं नाही तर डॉक्टर कंपनीत बोलवले. तर काही लोकांना सुट्टी दिली. काहींना सांगितलं तुम्ही डायरेक्ट घरी जा. मला काही मंडळी जेव्हा भेटले तेव्हा मी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गेलो. पोलिसांना कंपनीत घेऊन गेलो. तिथे गेल्यावर कंपनीवाले बेजबाबदारपणे काम करत होते. कुणी आतमध्ये येऊ देत नव्हते. पोलीस स्वत: सर्वांशी बोलले आणि सर्वांना इथे रुग्णालयात घेऊन आलो”, अशी प्रतिक्रिया मनसेच्या पदाधिकाऱ्याने दिली. आता या प्रकरणात काही कारवाई केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...