आधी दारू पाजली अन् मग तरूणीवर लैंगिक अत्याचार; घटनेने अमरावती शहर हादरलं

Amravati Physical Assault Case : अमरावतीमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. पाच जणांनी तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेने अमरावती शहर हादरलं आहे. अमरावती शहरातील या घटनेचे तपशील, वाचा सविस्तर...

आधी दारू पाजली अन् मग तरूणीवर लैंगिक अत्याचार; घटनेने अमरावती शहर हादरलं
क्राईम न्यूज
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 3:35 PM

ऐन दिवाळीच्या दिवशी अमरावतीतून हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. 25 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रागाने घराबाहेर पडलेल्या तरुणीवर पाच जणांचा सामूहिक अत्याचार झाला आहे. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना घडली आहे. 25 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराने अमरावती शहर हादरलं आहे. पाच आरोपींना अटक झाली आहे. चारचाकी गाडीत बसून युवकाने मद्यप्राशन केलं. त्यानंतर तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सर्व आरोपी अमरावती शहरातील आहेत. या आरोपींनी अटक देखील झाली आहे.

बलात्काराच्या घटनेने अमरावती शहर हादरलं

अमरावतीतील विलासनगर भागात ही पीडित तरूणी राहते. तिचं घरात भांडण झालं. त्यामुळे रागाच्या भरात ही तरूणी घराबाहेर पडली. रस्त्याने जात असताना तिच्या ओळखीच्या तरूणाने तिला त्याच्या गाडीवर बसवलं. तिचा राग शांत करण्यासाठी तिला रहदारी नसणाऱ्या भागात त्या तरूणीला नेलं. तिथं तिला दारू पाजली. या तरूणीला कारमध्ये बसवलं आणि त्याच्या इतर चार मित्रांना तिथं बोलावलं. मग तिला शेतात नेलं आणि आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला.

अमरावती शहरात 25 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच जणांनी तरूणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. मद्यप्राशन करून पाच जणांनी या तरूणीचं लैंगिक शोषण केलं आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपी अटकेत

पीडित तरूणीच्या तक्रारीनंतर बलात्कार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी या आरोपींना पकड आहे. या पाच आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे. तसंच या आरोपींकडून दुचाकी वाहन आणि कार देखील जप्त करण्यात आली आहे. मनोज डोंगरे (वय 29), अक्षय सरदार (वय 29), अजय लोखंडे (वय 28), मिलिंद दहाट (वय 30), प्रीतम धडसे (वय 19) या पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....