रवी राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांची पोलिसांत तक्रार, रवी राणा यांनी पुरावे सिद्ध करावे अन्यथा…

सुरेंद्रकुमार आकोडे

सुरेंद्रकुमार आकोडे | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Oct 23, 2022 | 9:19 PM

स्वतः मंत्रिपदाच्या रांगेत उभे राहता असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

रवी राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांची पोलिसांत तक्रार, रवी राणा यांनी पुरावे सिद्ध करावे अन्यथा...
रवी राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी फुंकले रणशिंग
Image Credit source: tv 9

अमरावती : अमरावतीमधील युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले. रवी राणा यांनी केलेल्या आरोपानंतर आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. आमदार रवी राणा यांनी बदनामी केली असल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी केला. रवी राणांविरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

आमदार रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्षे आम्ही राजकीय करिअर उभं करायला गेलं आहेत. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी दिले असतील. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहोत का. तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, असं बच्चू कडू म्हणाले.

आमदार रवी राणा यांनी आरोप केले तर पुरावे द्यावे. हा लहान विषय नाही आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून सांगता. दुसरीकडे स्वतः मंत्रिपदाच्या रांगेत उभे राहता असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. आता आरपारची लढाई लढायला मी तयार आहे.

जिथे म्हणाल तिथे एकटा यायला तयार आहे, असं खुल आव्हान बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिलं आहे. आमदार रवी राणा यांनी केलेले तोडपानीचे आरोप त्याचे पुरावे एक तारखेपर्यंत पुरावे द्या. पुरावे दिले तर मी त्याच्या घरी भांडे घासेन. नाही दिले तर त्यांना कायमचा हिजडा म्हणेल असं बच्चू कडू म्हणाले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI