AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati farmers | प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उभारली काळी गुढी, कपाळावर बांधल्या काळ्या पट्ट्या

2013 च्या कायद्यानुसार शेतजमिनीचा वाढीव मोबदला देण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी एक महिन्यापासून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ (Collector Office) आंदोलन सुरू आहे.

Amravati farmers | प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उभारली काळी गुढी, कपाळावर बांधल्या काळ्या पट्ट्या
अमरावतीत काळी गुढी उभारणारे प्रकल्पग्रस्त शेतकरी. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 3:09 PM
Share

अमरावती : गुढी पाडवा नवीन वर्षाची सुरुवात. सर्वत्र गुढीपाडव्याचा आनंद साजरा केला जात आहे. पण, अमरावतीत प्रकल्पग्रस्त (project affected) शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारली. कपाळावर काळ्या पट्ट्या बांधून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यातील मंत्र्यांविरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. 2013 च्या कायद्यानुसार शेतजमिनीचा वाढीव मोबदला देण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी एक महिन्यापासून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ (Collector Office) आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने ठोस तोडगा न काढल्याने आंदोलक शेतकरी आक्रमक (Farmer Aggressive) झाले आहेत.

महिन्याभरापासून सुरू आहे आंदोलन

2006 मध्ये धरणाच्या प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला हा 2013 च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना द्यावा या प्रमुख मागणीसाठी विदर्भातील शेकडो शेतकरी अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या परिसरात मागील एक महिन्यापासून आंदोलन करत आहे. परंतु एक आंदोलनाला एक महिना पूर्ण होत असताना देखील राज्य सरकारकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर झाल्या नाही. त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आज आंदोलन मंडपातच राज्य सरकार विरोधात काळी गुढी उभारून काळा गुढीपाडवा साजरा केला. यावेळेस आंदोलन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विदर्भातील लोकप्रतिनिधी, राज्यांतील सर्व मंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला. यावेळी आंदोलन शेतकऱ्यांनी कपाळावर काळ्या पट्ट्या देखील बांधल्या होत्या.

आंदोलकांवर गुन्हे दाखल

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या वाढीव मोबदल्याची मागणी मान्य व्हावी यासाठी एक महिन्यापासून शेकडो शेतकरी रंगरगत्या उन्हात आंदोलन करत आहे. एकीकडे राज्यभर नवीन वर्षाचे स्वागत व गुढीपाडवा साजरा होत असताना शेतकरी मात्र आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहे. आज काळी गुढी उभारत त्या गुढीचे पूजन करत राज्य सरकार विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. मागील एक महिन्यापासून प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलनात आहेत. त्यामुळे त्याचे मूल घरी होते. दरम्यान या मुलांची शाळा ही तीन दिवसांपूर्वी आंदोलन स्थळी भरवली होती. पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते.

Photo : नागपुरात Devendra Fadnavis यांनी उभारली गुढी, मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी दिल्या शुभेच्छा

Nagpur Election | प्रशासकीय राजवटीमुळं माजी नगरसेवकांच्या अडचणीत वाढ, निवडणूक खर्च वाढणार

Akola water | लोहारा येथे पाण्यासाठी मारामारी, पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे, विहिरींमध्ये ठणठणाट

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.