Amravati BJP | अमरावती भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरींविरोधात गुन्हा; परतवाड्यात शिवीगाळ केल्याचा आरोप

निवेदिता चौधरी होत्या. समोरून भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी हे जात होते. मिटिंग हॉलमध्ये गेल्यानंतर निवेदिता यांनी माझ्याकडे पाहून अश्लील शब्दात शिविगाळ केली

Amravati BJP | अमरावती भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरींविरोधात गुन्हा; परतवाड्यात शिवीगाळ केल्याचा आरोप
अमरावती भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरींविरोधात गुन्हाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 5:21 PM

अमरावती : ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी (Nivedita Chaudhary) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ब्राम्हण समाजाला उद्देशून शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस (Paratwada Police) स्टेशनमध्ये कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. परतवाड्यामध्ये काल शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. परशुराम जन्मोत्सव समितीच्या (Parashuram Janmotsav Samiti) अध्यक्ष यांच्या तक्रारीवरून निवेदिता चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अचलपूर तालुक्यातील परतवाडा पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष चेतन राजकुमार पुरोहित यांनी ही तक्रार केली आहे.

तक्रारीत नेमकं काय

चेतन पुरोहित यांनी तक्रारीत म्हटले की, निवेदिता चौधरी यांनी मला जातिवाचक व अश्लील शिविगाळ केली. दोन मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते सूर्यकमल हॉटेलमध्ये जमले होते. त्याठिकाणी निवेदिता चौधरी होत्या. समोरून भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी हे जात होते. मिटिंग हॉलमध्ये गेल्यानंतर निवेदिता यांनी माझ्याकडे पाहून अश्लील शब्दात शिविगाळ केली. ब्राम्हण गद्दार असतात, असं म्हटलं. यावेळी ब्राम्हण जातीविषयी द्वेष पसरविणारं वक्तव्य केलं. अपमानास्पद शब्दामुळं माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळं तक्रार केल्याचं चेतन पुरोहित यांनी म्हटलंय.

हे आहेत साक्षीदार

घटनेच्या वेळी कोण उपस्थिती होते. यासाठी साक्षीदार म्हणून त्यांनी काही नाव दिलेली आहेत. भाजप शहर उपाध्यक्ष अॅड. ठाकूर, शक्ती फाउंडेशनचे उपाध्यक्ष राम बघेल, भाजपा कार्यकर्ता, ललित ठाकूर, भाजपा कार्यकर्ता निगम बडगुजर तसेच नितीन चित्ते उपस्थित असल्याचं तक्रारीत म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.