AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim by-election | राज्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर; वाशिममध्ये 94 ग्रामपंचायतच्या 137 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक

निवडणूक असलेल्‍या क्षेत्रामध्‍ये निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत 9 जून 2022 पर्यंत अस्‍तित्‍वात राहील.

Washim by-election | राज्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर; वाशिममध्ये 94 ग्रामपंचायतच्या 137 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक
वाशिममध्ये 94 ग्रामपंचायतच्या 137 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 3:03 PM
Share

वाशिम : राज्‍य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार, निधन, राजीनामा किंवा इतर अन्‍य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील (Gram Panchayat) काही पदे रिक्त झाली आहेत. या रिक्‍त झालेल्‍या पदांच्‍या पोट निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर (program announced) केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील वाशिम (Washim) तालुक्यातील 7 ग्रामपंचायती, मालेगाव तालुक्यातील 8 ग्रामपंचायती, मंगरुळपीर तालुक्यात 7 ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. रिसोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायती व मानोरा तालुक्यातील 29 अशा एकूण 94 ग्रामपंचायतीमधील 137 रिक्‍तपदाच्‍या पोट निवडणुका घेण्‍यात येणार आहे.

9 जूनपर्यंत आचारसंहिता

निवडणूक असलेल्‍या क्षेत्रामध्‍ये निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत 9 जून 2022 पर्यंत अस्‍तित्‍वात राहील. मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना या कालावधीत करता येणार नाही. असे ग्रामपंचायत निवडणुकीचे नोडल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.

उमेदवार लागले तयारीला

पोटनिवडणूक जाहीर होताच उमेदवार तयारीला लागले आहेत. रिक्त झालेल्या जागेवर काही दिवसांसाठी का होईना, आपण गावचे कारभारी होऊ शकतो, याचा आस उभेच्छुकांना लागली आहे. त्यामुळं ते आता पोटनिवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदवारांना मतदारांशी संपर्क वाढवावा लागणार आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.