AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu : भक्ती म्हणजे प्रदर्शन असतं काय? अमरावतीत बच्चू कडू यांचा सवाल; राणा म्हणजे भाजपचं बुजगावणं

नवनीत राणा यांनी कारागृहातील सुविधीचे तक्रार केली. त्यावर बच्चू कडू म्हणाले, राणा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेलं बुजगावन आहे. राणा हे कलाकार आहेत. त्यांना रडायचं कधी हसायचं कधी हे जमते. जेलमध्ये काही फाईव्ह स्टार व्यवस्था मिळणार का. जे सामान्य कैद्यांना ते राणा यांना मिळणार.

Bachchu Kadu : भक्ती म्हणजे प्रदर्शन असतं काय? अमरावतीत बच्चू कडू यांचा सवाल; राणा म्हणजे भाजपचं बुजगावणं
राज्यमंत्री बच्चू कडू Image Credit source: facebook
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 26, 2022 | 2:13 PM
Share

अमरावती : हनुमान चालिसा हा भाजपचा अजेंडा आहे, असा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलाय. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावायचा भाजपचा (BJP) डाव आहे, असंही ते म्हणाले. राणा दाम्पत्याला अमरावतीमधून मुंबईत जाऊन हनुमान चालीसा म्हणायची गरज काय. भक्ती म्हणजे प्रदर्शन असत का? बच्चू कडू यांनी सवाल केलाय. राणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे घेऊन मत मागितले. तेव्हा मज्जीद, बौद्ध विहारमध्ये गेले. काजीला आणले होते. आता त्यांनी भूमिका बदलली. आधी शिवसेना-भाजप विरोधात मत मागितले. आता भाजपच्या दावणीला बांधले गेले आणि शिवसेनेला (Shiv Sena) बदनाम करत आहेत. राष्ट्रपती (NCP) राजवटीची मागणी करत आहे. पण याचे परिणाम राणा यांना आगामी निवडणुकीत भोगावे लागतील.

जिलेबी पाहिजे असेल तर आम्ही पाठवू

नवनीत राणा यांनी कारागृहातील सुविधीचे तक्रार केली. त्यावर बच्चू कडू म्हणाले, राणा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेलं बुजगावन आहे. राणा हे कलाकार आहेत. त्यांना रडायचं कधी हसायचं कधी हे जमते. जेलमध्ये काही फाईव्ह स्टार व्यवस्था मिळणार का. जे सामान्य कैद्यांना ते राणा यांना मिळणार. राणा यांना जर जेलमध्ये जिलेबी पाहिजे असेल तर आम्ही पाठऊ. कारागृहात सर्वसामान्य कैद्याप्रमाणेचं जीवन काढावे लागेल. त्यांना काही तिथं लक्झरी सुविधा मिळणार नाहीत, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

राणांनी भूमिका बदलली

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन नवनीत राणा यांनी प्रचार केला. शिवसेना-भाजप विरोधात मत मागितले. आता त्या भाजपच्या खेम्यात गेल्या आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मदत मागत आहेत. याचे परिणाम त्यांना पुढच्या निवडणुकीत भोगावे लागतील, असा आरोप बच्चू कडू यांनी केलाय. कलाकार माणसं फक्त कलाकारीच करू शकतात. नवनीत राणा या चांगल्या कलाकारी करतात. पण, आता ही कलाकारी महागात पडली असल्याचं ते म्हणाले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार