Akola: अकोल्यात भाजपचा मोठा’खेला’; काँग्रेसला हाबाडा, भाजपचाच महापौर होणार, शरद पवार राष्ट्रवादीचा पाठिंबा

Akola Municipal Corporation BJP Mayor: अकोला महानगरपालिकेत भाजपविरोधात आम्ही सारे असा प्रयोग ऐन भरात आले असतानाच भाजपने मोठा खेला खेळला. काँग्रेसला हाबाडा बसला.काय आहे ती विदर्भातील सर्वात मोठी अपडेट?

Akola: अकोल्यात भाजपचा मोठाखेला; काँग्रेसला हाबाडा, भाजपचाच महापौर होणार, शरद पवार राष्ट्रवादीचा पाठिंबा
अकोला महानगर पालिका
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 27, 2026 | 1:38 PM

Akola Municipal Corporation BJP Mayor: अखेर अकोला महानगरपालिकेवर सत्ता स्थापनाचा तिढा सुटला. भाजपविरोधात आम्ही सारे असा प्रयोग ऐन भरात आला असतानाच भाजपने डाव पालटला. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचितसह इतर पक्षांनी भाजपविरोधात प्रयोगाची चाचपणी केली. पण संख्याबळ अधिक असल्याने भाजपविरोधात इतर पक्षांची डाळ शिजली नाही. भाजपला आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अकोला महापालिकेत भाजपचाच महापौरावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 शहर सुधार आघाडी

अकोल्याचा सत्तेचा अंक अमरावतीत रंगला. अमरावती विभागीय आयुक्तांपुढे भाजपच्या नेतृत्वात शहर सुधार आघाडी महापालिकेत सत्ता स्थापन करणार आहे. अकोला महानगरपालिकेत एकूण 80 जागा आहेत. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता आहे. भाजपकडे 38 जागांचे बहुमत आहे. काँग्रेसकडे 21 नगरसेवक आहेत. 41 जागांसाठी भाजपला अगदी तीन जागा हव्या होत्या. नवीन समीकरणानुसार भाजपच्या आघाडीत राष्ट्रवादीचे 3, एकनाथ शिंदे शिवसेना, अजित पवार आणि शरद पवार राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक नगरसेवक सहभागी आहे. आता ही गोळाबेरीज 44 इतकी झाली आहे.

सत्ता स्थापनेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अकोल्यात भाजपाला पाठिंबा

अकोला महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. अकोला शहराच्या विकासासाठी सोबत गेल्याचा राष्ट्रवादीचे म्हणणं आहे. यामुळे भाजपचे महानगरपालिकेतील बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजप 38

राष्ट्रवादी-AP-1

शिवसेना शिंदे-1

राष्ट्रवादी SP-3

अपक्ष 1

वंचितचा मोट बांधण्याचा प्रयत्न फसला

भाजपविरोधात महापालिकेत मोट बांधण्याचा प्रयत्न वंचितने केला. पण संख्याबळाचे आकडे जमविण्यात मोठी अडचण होती. कारण वंचितचे पाच, एमआयएमचे तीन, अपक्ष दोन, दोन्ही राष्ट्रवादींचे चार, काँग्रेस 21 असा मेळ जमवूही 41 हा बहुमताचा आकडा जमविणे अवघड होते. त्यातच नगरसेवक पळवापळवची भीती सुद्धा होती. त्यामुळे हा प्रयोग बासणात बसला. शहर सुधार आघाडीत आता वंचित, एमआयएम आणि काँग्रेस वगळता इतर सर्व पक्ष एकत्र आले आहे. गेल्या एका आठवड्यापासून शहर महापालिकेसाठीचा हायहोल्टेज ड्रामा आता संपुष्टात आला आहे. भाजपविरोधात सर्वच पक्ष मोठा खेला करतील असे वाटत असतानाच भाजपने डाव टाकला.

44 उमेदवार आमच्या सोबत असलेला दावा भाजपाने केला असून विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या उपस्थितीमध्ये गटस्थापना सुरू असून अधिकृत माहिती थोड्याच वेळात मिळेल. आता महापौर पदी कोण बसणार याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी नावाने पण गट स्थापन होणार असल्याचे समजते.