AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नवनीत राणा आणि रवी राणा म्हणजे चलती का नाम गाडी’, महायुतीच्याच नेत्याची टीका

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्यापूर्वीच राज्यातील विविध मतदारसंघामध्ये मित्रपक्षांमध्येच उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अमरावतीत महायुतीच्याच एका नेत्याने राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

'नवनीत राणा आणि रवी राणा म्हणजे चलती का नाम गाडी', महायुतीच्याच नेत्याची टीका
navneet rana and ravi rana Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 29, 2024 | 6:15 PM
Share

अमरावती | 29 फेब्रुवारी 2024 : खासदार नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राच्या याचिकेवर काल (28 फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी कोर्टाने निर्णय राखून ठेवला. पुढच्या दोन आठवड्यात या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येईल, असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं. यानंतर शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या वकिलांनी राणा यांना वैध जातप्रमाणपत्र देता येणार नाही, असं महाराष्ट्र सरकारने कोर्टात सांगितल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे राणा यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात होतं. पण नंतर आमदार रवी राणा यांनी माध्यांसमोर येत संबंधित वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी नवनीत राणा यांची कोर्टात भक्कम बाजू मांडली आहे, असं रवी राणा यांनी सांगितलं. याउलट त्यांनी आंनदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधलाय.

“नवनीत राणा आणि रवी राणा म्हणजे चलती का नाम गाडी. यांना दोघांना काय काम धंदे राहिले नाहीत. अमरावती लोकसभेवर आजही शिवसेनेचा दावा आहे आणि त्या ठिकाणी आनंदराव अडसूळ हेच शिवसेनेचे उमेदवार आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना प्रचाराला यावं लागेल”, असं अभिजीत अडसूळ म्हणाले.

‘राणा यांना पैशांचा माज’

“नवनीत राणा, रवी राणा यांना पैशांचा माज आला आहे. यांना वाटतं की पैसे घेऊन ते सुप्रीम कोर्टाला देखील विकत घेऊ शकतात. अशा अशाप्रकारे वागत आहेत. पण सुप्रीम कोर्टाचा अजून निर्णय यायचा आहे. दोन आठवड्याचा कालावधी अजूनही बाकी आहे. पण तरी देखील अशा पद्धतीची विधानं म्हणजे पोरखेळ आहे, असंच मी म्हणेन”, अशी टीका अभिजीत अडसूळ यांनी केली.

“नवनीत राणा यांची पूर्ण वंशावळ आम्ही काढली. सुप्रीम कोर्टात गेलो, मग तिथे त्यांनी कसं त्याचं वजन वापरलं ते देखील आम्ही पाहिलं. त्यामुळे त्यांनी बोलताना तारतम्य वापरावं, असा इशारा अभिजीत अडसूळ यांनी दिला. अमरावतीच्या जागेवर आमचाच दादा कायम आहे. ती जागा आनंदराव अडसूळच लढवतील, विषय संपला”, असंही ते म्हणाले.

‘अडसूळ आणि मुख्यमंत्री हे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी येतील’

आमदार रवी राणा यांनीदेखील या प्रकरणावर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिलीय. “जातवाचक प्रमाणपत्राबाबत आम्ही कोर्टात 28 पेक्षा जास्त पुरावे दाखल केले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी नवनीत राणा यांची बाजू भक्कमपणे मांडली आहे. काही राजकीय नेते चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, हे कायद्याचे उल्लंघन आहे”, असं रवी राणा म्हणाले आहेत. “आनंदराव अडसूळ, अभिषेक अडसूळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी येतील. अडसूळ हे वरिष्ठ नेते ते नक्की राणा यांच्यासाठी मत मागतील”, असा दावा राणा यांनी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या तिकिटाबाबत निर्णय घेतील. आम्ही NDA चे घटक म्हणून त्यांच्यासोबत आहोत. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल”, असंही रवी राणा म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.