AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती पदवीधर मतदारसंघ, भाजपचे रणजित पाटील आणि काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांच्यात लढत, यांनी वेधले लक्ष

सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी कुठलेही ठोस कार्य केले नाही. आजही युवकांना रोजगार निमित्त पुन्हा पुणे, मुंबईमध्ये जावं लागतं, असा आरोप त्यांनी केला.

अमरावती पदवीधर मतदारसंघ, भाजपचे रणजित पाटील आणि काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांच्यात लढत, यांनी वेधले लक्ष
रणजित पाटील, धीरज लिंगाडे
| Edited By: | Updated on: Jan 12, 2023 | 7:04 PM
Share

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपकडून डॉ. रणजित पाटील (Ranjit Patil) यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय. तर काँग्रेसकडून धीरज लिंगाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रणजित पाटील हे गेली दोन टर्म निवडून आले आहेत. पाच जिल्ह्यातील या मतदारसंघात १ लाख ८५ हजार ९८५ नोंदणीकृत मतदारांची आकडेवारी प्रशासनानं जाहीर केली.  आज अमरावती (Amravati) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी अमरावतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार आणि आमदार रणजीत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

१२ वर्षात आमदार रणजीत पाटील यांनी काहीच काम केलेलं नाही. सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी कुठलेही ठोस कार्य केले नाही. आजही युवकांना रोजगार निमित्त पुन्हा पुणे, मुंबईमध्ये जावं लागतं, असा आरोप त्यांनी केला.

तसेच २००५ नंतर लागलेले शिक्षक त्यांचा जुना पेन्शनचा मुद्दा निकाली निघाला नाही. त्यामुळे हे सर्व मुद्दे घेऊन मी या निवडणुकीत पदवीधरासमोर मांडणार आणि ही निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी दिली.

काँग्रेसचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्या बॅनरवरून ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो गायब झालेत. महाविकास आघाडी मध्येही उमेदवारीवरून धुसपूस असल्याची चर्चा आहे.

उपेंद्र पाटील यांनी वेधले लक्ष

अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी उपेंद्र बाबाराव पाटील यांनी शर्ट काढून चक्क बनियानवर येऊन अर्ज दाखल केला. त्यांना अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात पोलिसांनी रोखले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी परवानगी दिली व त्यांचा अर्ज स्वीकारला.

तोपर्यंत अंगात शर्ट घालणार नाही

कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार १०० टक्के अनुदान द्यावे. पटसंख्येचे निकष लावून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नये. शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. पदवीधर बेरोजगार यांना न्याय मिळावा. यासाठी आपली उमेदवारी असल्याचे उमेदवार पाटील यांनी सांगितले. या उमेदवाराची विभागीय आयुक्त परिसरात चांगलीच चर्चा झाली. निवडून आल्यास मागण्या मान्य होईतोवर अंगात शर्ट घालणार नाही,  असल्याचही ते म्हणाले.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.