AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नया है वह ?, चक्क बेडकाने गिळले सापाला, कसे काय घडले?

या आगळ्या वेगळ्या इंडियन बूल फ्रॉग बेडकाचा नैसर्गिक अधिवास मुख्य करुन पाणथळ जागांमध्ये, म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलाशयांमध्ये असतो. अशा बेडकाच्या काही विचित्र सवयी आहेत.

नया है वह ?, चक्क बेडकाने गिळले सापाला, कसे काय घडले?
| Updated on: Jun 11, 2025 | 8:12 PM
Share

निसर्गाचे नियम वेगळे असतात. येथे बेडुक हे सापांचे आवडते खाद्य मानले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात एका रोमांचक घटनेची नोंद झाली आहे. येथे इंडियन बूल फ्रॉग (Indian Bullfrog – Hoplobatrachus tigerinus) या बेडकाने चक्क नानेटी साप (Common Trinket Snake) गिळल्याचे दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. प्राणी आणि पक्षी मित्र तसेच वन्यजीव अभ्यासक मंगेश माणगावकर यांच्या घरी असलेल्या बेडूक उद्यानात ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे, जी वन्यजीव अभ्यासात एक महत्त्वपूर्ण भर आहे.

इंडियन बूल फ्रॉग: एक आक्रमक भक्षक

‘इंडियन बूल फ्रॉग’ हा दक्षिण आणि आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या बेडकांपैकी एक आहे, ज्याची लांबी १७० मिलिमीटर ( ६.७ इंच ) पर्यंत वाढू शकते. सहसा हिरव्या किंवा तपकिरी रंगाचे असणारे या बेडूक जातीतील नर प्रजननाच्या काळात मात्र पिवळ्या रंगाचे होतात. हा बेडूक त्याच्या भक्षक स्वभावासाठी ओळखला जातो. तो केवळ कीटकच नाही, तर इतर बेडूक, सरडे, पाली, लहान साप, लहान पक्षी आणि अगदी लहान सस्तन प्राणी देखील खातो. तो दिसेल ते आणि त्याच्या तोंडात मावेल ते सर्व गिळतो, त्यामुळे त्याला “अतृप्त भक्षक” असेही म्हटले जाते.

येथे पहा व्हिडीओ –

नैसर्गिक अधिवास कुठे ?

या इंडियन बूल फ्रॉग बेडकाचा नैसर्गिक अधिवास मुख्यत्वे पाणथळ जागांमध्ये, म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलाशयांमध्ये, विशेषतः भातशेतीत असते. तो जंगली किंवा किनारी भागात सहसा दिसत नाही. बहुतेक वेळा तो एकटाच असतो. तसेच तो निशाचर असतो. कायमस्वरूपी पाण्याच्या स्रोतांजवळच्या बिळांमध्ये आणि झुडपांमध्ये तो राहतो. पावसाळ्यात, प्रजननासाठी ते तात्पुरत्या पाण्याच्या डबक्यांमध्ये एकत्र येतात. या घटनेमुळे इंडियन बूल फ्रॉगच्या भक्ष्यवर्तनावर अधिक प्रकाश पडला आहे आणि वन्यजीव अभ्यासकांना या प्रजातीबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.