कोकणातली सर्वात मोठी आंगणेवाडीची यात्रा रद्द, काय आहे ही यात्रा?

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे (Anganwadi yatra cancelled this year due to corona pandemic).

कोकणातली सर्वात मोठी आंगणेवाडीची यात्रा रद्द, काय आहे ही यात्रा?

मुंबई : कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. त्याचबरोबर कोरोनाची नियमावली पाळून आंगणेवाडीच्या यात्रेत फक्त धार्मिक विधी केले जातील, असं देखील त्यांनी सांगितलं (Anganwadi yatra cancelled this year due to corona pandemic).

“आंगणेवाडीच्या जत्रा 6 मार्चला निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’च्या धर्तीवर ‘माझी जत्रा, माझी जबाबदारी’ अशी मोहिम राबवण्याचं ठरवलं आहे. भराडीदेवीची यात्रा भाविकांसाठी बंद राहील. मात्र, धार्मिक कार्यक्रम दोन दिवस सुरू राहणार आहेत. धार्मिक कार्य कसं करायचं यावर आज तिथल्या मंडळाची माझ्याबरोबर बैठक झाली”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

“ट्रस्टची आणि पालकमंत्री म्हणून माझी भाविकांना विनंती आहे, यात्रेकरूनी यावर्षी दर्शनासाठी येऊ नये. त्याचबरोबर आंगणेवाडी ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. आम्ही यात्रेकरूना नम्र विनंती करतो त्यांनी आम्हाला सहकार्य करावं”, असं आवाहन सामंत यांनी केलं (Anganwadi yatra cancelled this year due to corona pandemic).

आंगणेवाडी विकास मंडळाचे पदाधिकारी भास्कर आंगणे यांनीदेखील यावेळी प्रतिक्रिया दिली. “यावर्षी आंगणेवाडीची जत्रा साध्या पद्धतीने साजरा केली जाणार आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात तारीख जाहीर केली होती. तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा होता. तेव्हाच आम्ही यात्रा आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादीत ठेवण्याचा निर्णय घेतला”, असं भास्कर आंगणे यांनी सांगितलं.

आंगणेवाडीची यात्रा नेमकी आहे तरी काय?

आंगणेवाडी ही मसुरे गावातील वाडी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील मसुरे हे सर्वात मोठे गाव आहे. आंगणेवाडीची यात्रा सिंधुदुर्गासह देशभरात प्रसिद्ध आहे. या यात्रेला राज्यासह देशभरातील नागरिक येतात. ही यात्रा दोन दिवसांची असते. विशेष म्हणजे कोणतीही तिथी बघून यात्रेची तारीख ठरवली जात नाही तर देवीचा कौल घेऊन तारीख ठरवली जाते. या यात्रेला लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाला येते. भराडी देवी नवसाला पावते, अशी ख्याती आहे.

हेही वाचा : आनंदाचा हॅशटॅग #आंगणेवाडीजत्रा

Published On - 7:56 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI