Anil Parab: शवागर आणि शवपेटीशिवाय दोन दिवस मृतदेह ठेवता येतो का? अनिल परब यांचा सवाल
माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी खळबळजनक दावा केला. त्यावर आता अनिल परब यांनी मोठा खुलासा केला आहे. शवपेटीशिवाय दोन दिवस मृतदेह ठेवता येतो का? असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.

नेस्को सेंटरमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी यांनी खळबजनक दावा केला होता. त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी खळबळजनक वक्तव्य केले. बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवला? याचा तपास करावा असे रामदास कदम यांनी म्हटले होते. त्यावर आता अनिल परब यांनी वक्तव्य करत शवागर आणि शवपेटीशिवाय दोन दिवस मृतदेह ठेवता येतो का? असा सवाल केला आहे.
काय म्हणाले अनिल परब?
‘शंभर टक्के खोटं आहे. बाळासाहेबांना भेटायला गर्दी होती. तुम्ही सर्व प्रेसवाले होते. कोणतीही बॉडी दोन दिवस अशी ठेवता येते का? शवपेटीशिवाय मृतदेह ठेवता येते का? रामदास कदमची अक्कल गुडघ्यात आहे. त्याला कोणी जे काही सांगितलं ना त्याने हा तरी विचार करायला हवा होता की, कोणताही मृतदेह शवागराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कोणतीही इंजेक्शन दिली, काहीही केलं तरी कोणत्या मुंबईतील डॉक्टरांची हिंमत आहे. तिथे पथक आहे. डॉक्टर असं चुकीचं करतील. ते असे बॉडी दोन दिवस ठेवतील. हे चुकीचे आरोप आहेत’ असे अनिल परब म्हणाले.
वाचा: अक्षय कुमारच्या लेकीकडे झाली होती न्यूड फोटोची मागणी, नेमकं काय घडलं? वाचा
पुढे त्यांनी बाळासाहेब असतानाचा उल्लेख करत, ‘ते हयात असताना त्यांनी त्यांच्या हाताचे मोड्ल बनवले होते. हे मोल्ड कुठे ठेवले होते माहीत आहे का? सहाराचं स्टेडियम झालं, तिथे ते बनवले होते. बाळासाहेबांच्या हयातीतच. बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत बनवले होते. हा मोल्ड आहे. याला ठसे म्हणत नाहीत. हा पंजाचा मोल्ड आहे. रामदास कदम यांचं शिक्षण कमी आहे. मोल्ड आणि ठश्यातील. बाळासाहेब गेल्यावर ठसे घेतले हा त्यांचा आरोप आहे. असे कोणते ठसे घेतले. त्याचा कोणता वापर होतो. स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहीत आहे का? रामदास कदमचं अकाऊंट आहे का तिकडे? अशा प्रकारे ठसे घेऊन स्विस बँकेतून पैसे काढता येतात? बाळासाहेबांचं मृत्यूपत्र माझ्याकडे आहे. त्यांची संपत्ती काय होती हे माझ्यापेक्षा कुणाला माहीत नाही’ असे म्हटले.
बाळा साहेबांच्या मृत्यूचं राजकारण केलं जात आहे असे म्हणत अनिल परब म्हणाले, शरद पवार आहेत ना आज. त्याचे उत्तर ते देऊ शकतात. मिलिंद नार्वेकरही आहेत. हे लोक वातावरण तयार करत आहेत. मी म्हणतो आता मी कोर्टात फाईल करतो. कोण डॉक्टर आहे. त्याला समोर आणा. आम्हाला पाहायचं आहे. हे केवळ हवेत बार सोडले जात आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करत आहेत. त्यांनी सर्व प्रयत्न केला. पक्ष चोरला. काही झालं नाही. माणसं चोरली. काही झालं नाही. आता बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण केलं जात आहे असे अनिल परब म्हणाले.
पुढे ते म्हणाले, खूप मोठे लोकं वर येत होते. उद्धव ठाकरेंना भेटत होते. बाळासाहेबांचा मृत्यू दुपारी जाहीर केला. त्या मिटिंगला मी होतो. उद्या सकाळी बाळासाहेबांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून न्यायचा हा प्रस्ताव होता. नंतर मातोश्रीतूनच अंत्ययात्रा करायची असा दुसरा प्रस्ताव आला. त्यावर एकमत झालं. कारण गर्दी होणार होती. अंत्ययात्र कशी करायची हे नेत्यांनी ठरवलं. दिवाळीसाठी पार्थिव ठेवलं नाही. असं काही झालं नाही. मेडिकली मृतदेह ठेवता येत नाही. शवागरासह ठेवणं शक्य नाही. रामदास कदम शिळ्या कढीला ऊत आणत आहे. उद्धव ठाकरे वाईट होते तर तुम्ही मंत्रीपद का घेतलं. उद्धव ठाकरेंकडून भिकाऱ्यासारखं मला महापालिकेतून आमदार करा. हे भिकेचा कटोरा घेऊन फिरत होते. यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती. माझी आई वारली त्या दिवशी मी सूत्रे घेतली. केवळ मनासारखं झालं नाही. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून उद्धव ठाकरे वाईट ही भूमिका झाली.
