AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संबंध ठेवले, चोरून व्हिडीओ काढले…, महिलेनं सांगितली आपबिती; प्रांजल खेवलकर प्रकरणात हादरवणारी माहिती

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून, त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंध ठेवले, चोरून व्हिडीओ काढले..., महिलेनं सांगितली आपबिती; प्रांजल खेवलकर प्रकरणात हादरवणारी माहिती
| Updated on: Aug 15, 2025 | 5:11 PM
Share

काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी भागात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा मारला होता. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती, सध्या ते जेलमध्ये आहेत. या प्रकरणावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं होतं, जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. दरम्यान त्यानंतर आता प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. आणखी एका प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महिलेशी संबंध ठेवताना चोरून व्हिडीओ काढल्याप्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित महिलेनं या संदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती, या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहमती नसतानाही चोरून आक्षेपार्ह व्हिडीओ काढले, त्याचा चुकीचा वापर केला अशी तक्रार या महिलेनं सायबर पोलिसांकडे केली होती. त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान यापूर्वी प्रांजल खेवलकर प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील गंभीर आरोप केले होते.  खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आहेत, त्यामुळे या प्रकरणाचा तपास  महिलांची तस्करी या दृष्टीनेही करावा अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली होती, या संदर्भात महिला आयोगाकडून पोलीस महासंचालकांना एक पत्र देखील पाठवण्यात आलं होतं.

दरम्यान रुपाली चाकणकर यांनी केलेल्या आरोपांनंतर एकनाथ खडसे यांनी देखील त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यामुळे वातावरण चांगलंच तापलं. याविरोधात जळगावमध्ये भाजपकडून एकनाथ खडसे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं.

दरम्यान त्यानंतर आता या महिलेनं सायबर पोलीसमध्ये प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात तक्रार केल्यानं पु्न्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात गुन्हा दखल केला आहे. परवानगी नसतानाही फोटो काढल्याचा या महिलेचा आरोप आहे.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.