अमरावती : कोणतीही धमकी (Threat) गांभीर्याने घेतली पाहिजे. कोणतेही सरकार असो, धमकी आल्यानंतर केंद्र सरकारने तपास यंत्रणांसह यामागे कोणती शक्ती आहे, याचा शोध घ्यायला हवा, तत्काळ अशा घटनांची दखल गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. ते अमरावतीत बोलत होते. अजित पवार दोन दिवसीय अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मेळघाटातील बालमृत्यू, तेथील स्थानिकांच्या समस्या याचा आढावा घेणार आहेत. मागील काही दिवसांत कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याविषयी काय उपाययोजना करता येतील, याचा ते आढावा घेणार आहेत. त्यासोबतच पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासंबंधी मदत आणि इतर बाबींचाही आढावा आपल्या या दौऱ्यात अजित पवार घेणार आहेत.