Mohit Kamboj : कंबोज यांचा रोख अजित पवारांकडे नाही; राष्ट्रवादीचा ‘तो’ पाचवा नेता कोण? निंबाळकरांनी स्पष्टच सांगितले

मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळा प्रकरणात एकापाठोपाठ सलग पाच ट्विट केले होते. त्यात त्यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले होते. आता या सर्व प्रकरणावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mohit Kamboj : कंबोज यांचा रोख अजित पवारांकडे नाही; राष्ट्रवादीचा 'तो' पाचवा नेता कोण? निंबाळकरांनी स्पष्टच सांगितले
अजित पवार, रणजितसिंह नाईक निंबाळकरImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 8:44 AM

सोलापूर : भाजप (BJP)  नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी दोन दिवसांपूर्वी सिंचन घोटाळा प्रकरणात एकापाठोपाठ सलग पाच ट्विट केले होते. त्यात त्यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले होते. आता या सर्व प्रकरणावर माढ्याचे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटचा रोख हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडेच असल्याचे मानले जात होते. मात्र मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या ज्या नेत्याबाबत हे ट्विट केले आहे, तो नेता अजित पवार नसून दुसराच असल्याचा गौप्यस्फोट निंबाळकर यांनी केला आहे. लवकर ही माहिती समोर येईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बडा नेता कोण असावा असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

निंबाळकर यांनी नेमकं काय म्हटलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच बडे नेते ईडीच्या रडारवर आहेत. मात्र आताच त्या 5 जणांची नावे सांगणे गोपनीयतेचा भंग होईल. येत्या काळात ती नावे सर्वांसमोर येतीलच. मोहित कंबोज यांनी काही ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. तसेच राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असे म्हटले होते. मात्र मोहित कंबोज यांचा रोख हा विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे नसून  तो पक्षातील दुसराच नेता आहे, असे निंबाळकर यांनी म्हटले आहे. दरम्यान निंबाळकरांच्या या वक्तव्यानंतर पाचवा नेता कोण असा प्रश्न त्यांना विचारला असता ते आपल्याला लवकरच कळेल असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच मिळणार

सध्या शिंदे गट आणि शिवसेनेचा न्यायालयात वाद सुरू आहे. शिवसेनेने सुप्रीम कोर्टात शिंदे गटाविरूद्ध  विविध याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणावर देखील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाच मिळणार आहे. शिंदे गटाचा विजय निश्चित आहे.  त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटालाच मिळेल असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.