पक्ष्यांच्या किलबिलाटाने होणारी सकाळ क्वचितच, पक्षीमित्राने डोकं लावलं, चिमण्यांची अंगणामध्ये गर्दी करायला सुरुवात!

पक्ष्यांच्या किलबिलाटाची रम्य सकाळ पुन्हा अनुभवता यावी, यासाठी इस्मालपूरच्या एका पक्षीमित्राने एक आयडियाची कल्पणा राबविली आणि पक्ष्यांनीही त्याच्या अंगणात गर्दी करायला सुरुवात केली. Arrange bird food and nests birds began Chirp islampur birds Friend idea

पक्ष्यांच्या किलबिलाटाने होणारी सकाळ क्वचितच, पक्षीमित्राने डोकं लावलं, चिमण्यांची अंगणामध्ये गर्दी करायला सुरुवात!
चिमण्यांसह लाल बुडाचा पक्षी, कबुतर, कोकीळ, कवडा असे अनेक पक्षी आष्पाक आत्तार त्यांच्या अंगणात आता गर्दी करू लागले आहेत.

सांगली : वाढते प्रदूषण, दिवसेंदिवस होत चाललेलं शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे पक्ष्यांच्या अनेक जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. यापूर्वी प्रत्येकाच्या अंगणात हमखास दिसणारी चिमणी तर गेल्या कित्येक वर्षापासून दिसेनासी झाली आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि चिमण्यांच्या चिवचिवाटाने होणारी सकाळ आता ग्रामीण भागात क्वचितच कोठेतरी पाहायला मिळते. हीच रम्य सकाळ पुन्हा अनुभवता यावी, यासाठी इस्मालपूरच्या एका पक्षीमित्राने एक आयडियाची कल्पणा राबविली आणि पक्ष्यांनीही त्याच्या अंगणात गर्दी करायला सुरुवात केली. (Arrange bird food and nests birds began Chirp islampur birds Friend idea)

पक्ष्यांच्या अन्नपाण्याची, घरट्यांची तजवीज केली अन् पक्ष्यांनीही अंगणात गर्दी करायला सुरुवात केली…!

शहरातील आपली प्रत्येक सकाळ ही अशीच चिमण्यांच्या चिवचिवाटाणे आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने व्हावी या उद्देशाने पक्षीमित्र आष्पाक आत्तार यांनी सांगलीच्या इस्लामपूर येथील आपल्या घराच्या परिसरामध्ये पक्ष्यांच्या अन्नपाण्याची तसेच त्यांच्या घरट्यांची तजवीज केली आहे.

पक्ष्यांनीनीही त्यांच्या प्रयत्नांना साथ देत त्यांच्या अंगणामध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दिवसभर चिमण्यांचा चिवचिवाट आणि कोकिळेची कुहूकुहू ऐकल्यानंतर क्षणभर पक्ष्यांच्या जगात अर्थात जंगलात गेल्यासारखा भास होतो, अशा भावना आष्पाक आत्तार यांनी व्यक्त केल्या.

दिवसभर चिमण्यांचा चिवचिवाट, पक्ष्यांचा किलबिलाट

चिमण्यांसह लाल बुडाचा पक्षी, कबुतर, कोकीळ, कवडा असे अनेक पक्षी त्यांच्या अंगणात आता गर्दी करू लागले आहेत. त्यांच्या अंगणातील दाणे टिपणाऱ्या चिमण्यांच्या मनमोहक अदा तर मनाला भुरळ पाडतात. त्या सर्वांना पाहता याव्यात म्हणून त्यांनी या चिमण्यांच्या अदा चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.

(Arrange bird food and nests birds began Chirp islampur birds Friend idea)

हे ही वाचा :

मालेगावात यंत्रमाग उद्योगाला अवकळा; कापडाला मागणीच नसल्याने कारखाने पुन्हा बंद

आंबिल ओढा परिसरातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI