‘संविधान खरंच खतरे में है…’, नाशिकमधून अरविंद सावंत यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
नाशिकमध्ये भगवान महावीर जनकल्याण सोहळा आणि महावीर जयंती निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नाशिकमध्ये भगवान महावीर जनकल्याण सोहळा आणि महावीर जयंती निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर ते बोलत होते. संसदेमध्ये विरोधकांना पण ऐकलं जात होतं. तेव्हा प्रसिद्धी माध्यमं वेगळी होती, दूरदर्शन आले क्रांती झाली, नव नवे प्रसिद्धी माध्यमं आले आणि त्यानंतर लोकशाहीचे प्रश्न निर्माण झाले, असं यावेळी सावंत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अरविंद सावंत?
अरविंद सावंत यांनी या कार्यक्रमात बोलताना भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मोदी साहेब नतमस्तक होऊन सभागृहात आले, तेव्हा वाटले लोकशाहीचा आता सन्मान होईल, २०२४ मध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना प्रोत्साहन द्या असं मी सांगितले होते, एक रेल्वे अपघात झाला तर लाल बाहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता, मात्र इथेतर रेल्वेचे एवढे अपघात झाले.
संविधान खरच खतरे में है, वक्फचा कायदा आणला, इथे नफेखोरांचे राज्य आहे. सेवेचं राज्य नाही. मुंबईतली बिल्डिंग कोसळी तरी चर्चा झाली नाही, कुंभमेळ्यात एवढी लोक गेली त्याचं काय झालं? आम्हाला तर 30 चाच आकडा सांगितला होता. आम्हाला सभागृहात चर्चा करू दिली नाही. 2014 पूर्वी जीएसटीला कोणी विरोध केला? आधार कार्डला कोणी विरोध केला होता? जेव्हा रुपयामध्ये घसरण सुरू होती, तेव्हा हे तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काय बोलले होते? कायदा करतात त्यातून न्याय द्यायचा आहे की त्रास? राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा का आणला? त्यानुसार दोन तृतीयअंश सदस्यांना पक्षांतर करता येतं, असा नियम बनवला आहे. मात्र हे दोन तृतीयअंश कुठे गेले, सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले तिथे कोणाचं राज्य आहे? असा सवालही यावेळी सावंत यांनी उपस्थित केला. भाजपमध्ये आता छोट्या मनाची माणसे आहेत, आता देशातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष कोणता असेल तर तो भाजप आहे, असा भ्रष्टाचार करतात की समजत पण नाही, असा टोला यावेळी सावंत यांनी भाजपला लगावला आहे.
