प्रकाश आंबेडकरांना जागा सोडा, मला काहीच नको, ओवेसींचं काँग्रेसला आवाहन

नांदेड : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना जागा सोडा, मला काहीच नको, अशी भूमिका घेत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पहिल्यांदाच काँग्रेससोबत समन्वयाची जाहीर भूमिका घेतली आहे. नांदेडमध्ये आज एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीची जाहीर सभा झाली. गेल्या काही सभांमधून गायब असलेले असदुद्दीन ओवेसी हे पुन्हा या आघाडीच्या …

प्रकाश आंबेडकरांना जागा सोडा, मला काहीच नको, ओवेसींचं काँग्रेसला आवाहन

नांदेड : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना जागा सोडा, मला काहीच नको, अशी भूमिका घेत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पहिल्यांदाच काँग्रेससोबत समन्वयाची जाहीर भूमिका घेतली आहे. नांदेडमध्ये आज एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीची जाहीर सभा झाली. गेल्या काही सभांमधून गायब असलेले असदुद्दीन ओवेसी हे पुन्हा या आघाडीच्या व्यासपीठावर परतले.

ओवेसी नेमकं काय म्हणाले?

“काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मी नको असेल, तर मी बाहेर पडतो. तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी बोला. त्यांना हव्या तितक्या जागा द्या, त्यांच्या अटी मान्य करा. मी लोकसभेची एकही जागा लढवणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावर पण येणार नाही. बाळासाहेबांसोबत तुमची आघाडी झाली, तर मी स्वतंत्र सभा घेऊन त्या आघाडीचे स्वागत करेन.” – असदुद्दीन ओवेसी

ठाकरे, मोदी, फडणवीस हिंदुस्थानाला मजबूत करणार नाहीत, ते फक्त प्रकाश आंबेडकर करतील, असा विश्वास व्यक्त करताना, ओवेसी पुढे म्हणाले, “आम्ही मोदींपासून, ठाकरेंपासून, फडणवीसपासून, पवारांपासून आझादी मागतो आहोत.”

यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला. “तेलंगाणाच्या निवडणुकीआधी विचारत होते, काही मदत होईल का? आणि आता फक्त प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करत आहे.”, अशी टीका ओवेसींनी केली.

मी प्रकाश आंबेडकरांसोबत आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणाच नाही, तर देशातील मुसलमान तुमच्या सोबत आहे, असा विश्वास ओवेसींनी प्रकाश आंबेडकरांना दिला. तसेच, ओबीसी, दलित, मुसलमान समाजातील वंचितांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *