महाविकास आघाडी सरकार गॅसवर; आशिष शेलार यांचा दावा

महाविकास आघाडीचं सरकार हे गॅसवर असल्याचा दावा भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. (ashish shelar slams thackeray government over sonia gandhi's letter)

महाविकास आघाडी सरकार गॅसवर; आशिष शेलार यांचा दावा
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 1:08 PM

मुंबई: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रं म्हणजे संवाद असून दबावतंत्राचा भाग नसल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार हे गॅसवर असल्याचा दावा भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. (ashish shelar slams thackeray government over sonia gandhi’s letter)

आशिष शेलार यांनी सोनिया गांधी यांच्या पत्रावरून राज्य सरकारला घेरले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वंचितांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. केंद्र सरकारच्या या योजनांचा फायदा राज्य सरकार जनतेला देत नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार गॅसवर आलं असून सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्वत:चा पक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावाही शेलार यांनी केला.

काँग्रेसची सत्तेसाठी लाचारी

भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सत्तेसाठी लाचार आहे. या सरकारचा कुठलाही किमान समान कार्यक्रम नाही. केवळ सत्ता वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेत्यांची दिशाभूल केली आहे, हे सोनिया गांधी यांच्या पत्राद्वारे स्पष्ट झालं आहे. सत्ते करिता किती लाचारी स्वीकारायची हे स्थानिक नेतृत्वाने करून दाखवलं आहे, अशी टीकाही त्यांनी कुणाचंही नाव न घेता केली.

हा तर संवाद: थोरात

राज्य सरकारवर काँग्रेसची कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधी यांचं पत्रं केवळ संवाद आहे. हा लेटरबाँब नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. राज्यात महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर आधारीत आहे. सामान्य माणूस हा आघाडीच्या केंद्रस्थानी आहे. गरीब, मागासवर्गावर सरकारने अधिक लक्ष द्यावं ही आमची भूमिका आहे. त्यामुळे सरकारवर नाराजीचा प्रश्नच येत नाही, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

भुजबळ, मलिक यांची सारवासारव

राज्यातील मागासवर्ग, गरीब आणि अल्पसंख्याकांना संरक्षण देणं ही काँग्रेसची पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे. त्यामुळे सोनिया गांधी या मुख्यमंत्र्यांशी बोलल्या असतील तर त्यात काही चूक आहे, असं वाटत नाही, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करतात. त्यांना काही सूचनाही करत असतात. सोनिया गांधींना मुख्यमंत्र्यांशी वारंवार चर्चा करता येत नसेल, त्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं असेल, असं भुजबळ म्हणाले. सोनिया गांधी फोन करून विविध मुद्द्यांवर चर्चा करत असतात हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनी या चर्चांचा एक भाग म्हणूनच पत्र लिहिलं असेल. हा दबावतंत्राचा भाग आहे, असं वाटत नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. कोरोना संकटामुळे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. सरकारच्या अडचणीही वाडल्या आहेत. अशा परिस्थितीतही किमान समान कार्यक्रम राबवला जावा, अशी भूमिका मांडणं काही गैर नाही, असंही ते म्हणाले. (ashish shelar slams thackeray government over sonia gandhi’s letter)

संबंधित बातम्या:

सोनियांचा लेटरबाँब नाही, संवाद; पत्रावर तिन्ही पक्षांची सारवासारव?

महाआघाडी सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल? ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसची चक्क दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स?

काँग्रेससाठी ऐतिहासिक दिवस; ते ‘स्पेशल 23’ इतिहास घडवणार की विजनवासात जाणार?

सोनिया गांधींचं पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही, राऊतांची सावध प्रतिक्रिया; शिवसेना बॅकफूटवर?

(ashish shelar slams thackeray government over sonia gandhi’s letter)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.