AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धपुरुषाच्या सहवासात…भोंदू खरातचे नामकर्ण आवारे यांच्याकडून तोंडभरून कौतुक, पुरावाच आला समोर!

अशोक खरात आणि नामकर्ण आवारे यांचा संबंध काय, याची चौकशी करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली होती. आता आवारे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राची काही पाने समोर आली आहेत.

सिद्धपुरुषाच्या सहवासात...भोंदू खरातचे नामकर्ण आवारे यांच्याकडून तोंडभरून कौतुक, पुरावाच आला समोर!
ashok kharat and namkarn awareImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 30, 2026 | 8:05 PM
Share

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याचे अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याने हे प्रकरण राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच खरात प्रकरणात आता नामकर्ण आवारे या नावाचीही चर्चा सुरू आहे. आवारे हे सिन्नर औद्योगिक वसाहतीचे चेअरमन आहेत. आवारे आणि भोंदू खरात यांचे जवळचे संबंध होते, असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच आवारे हे खरातला सिद्धपुरुष म्हणायचे, असेही त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवल्याचेही अंधारे यांनी सांगितले. आवारे यांनी मात्र खरातशी माझा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आता याच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना आवारे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राची काही पाने समोर आली आहेत. या पुस्तकात त्यांनी खरातविषयी भरभरून लिहिल्याचे दिसत आहे.

आवारे यांच्या पुस्तकात नेमके काय आहे?

नामकर्ण यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव ‘असा मी नामकर्ण’ असे आहे. या पुस्तकाची प्रस्तावनाच भोंदू अशोक खरातने लिहिलेली आहे. प्रस्तावनेच्या शेवटी खरात हा ब्रह्मांडशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच तो फ्रान्समधील सोबॉर्न विद्यापीठातून ओसिनोलॉजी शिकून आल्याचेही सांगण्यात आले आहे. याच पुस्तकात पान क्रमांक 182, 183 आणि 184 वर अशोक खरातचा उल्लेख आहे. अशोक खरताने केलेली भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली, असं या पानांवर सांगण्यात आले आहे. तसेच या लेखाचे शीर्षकच ‘सिद्ध पुरुषाच्या सहवासात’ असे आहे. अशोक खरात याला आवारे यांनी सिद्धपुरुष म्हटलेले आहे.

आवारे यांचे नेमके म्हणणे काय?

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी हे आवारे कोण आहेत, त्यांचा भोंदू खरातशी काय संबंध आहे, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी दाखवलेल्या फोटोमध्ये दीपक केसरकर आमच्या संस्थेत आले होते. आम्ही त्यांचा सत्कार केला. संस्थेचा चेअरमन म्हणून मी त्यांच्यापुढे आमच्या संस्थेचे काही प्रश्न मांडले होते. माझ्या माहितीप्रमाणे केसरकर यांच्यासोबत खरात होते. खरात हे आमच्या संस्थेत सभासद नाहीत. त्यांनी आमच्या उद्योगात भागिदारी केलेली नाही. आमच्या औद्योगिक वसाहतीत त्यांचा उद्योजक म्हणून संबंध नाही, असे आवारे यांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात आता नेमके काय काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात