AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरात प्रकरणात नवी खळबळ! रुपाली चाकणकरांच्या अडचणीत होणार वाढ?

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपेडटे समोर आली आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशोक खरात प्रकरणात नवी खळबळ! रुपाली चाकणकरांच्या अडचणीत होणार वाढ?
अशोक खरातImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 30, 2026 | 1:27 PM
Share

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातचे रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यामुळे खळबळ माजली होती. आज (सोमवार) या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आज विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे चाकरणकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एसआयटीने आज खरातच्या मोबाइल फोनवरील डेटाची सखोल क्रॉस चौकशी करण्यावर भर दिला आहे. कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स, मेसेजेस आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी आज प्राधान्याने सुरू आहे. मोबाइलमधील विविध संपर्कांच्या आधारे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहे. पुढील काही तासांत याबाबत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खरातच्या मोबाइलमध्ये काय सापडले?

तपासकर्ते आता खरातच्या मोबाइलमधून उघड होणाऱ्या संपर्कांच्या साखळीचा आकार समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे प्रकरण कोणत्या नव्या वळणावर जाईल, याकडे राजकीय आणि तपास वर्तुळात लक्ष लागले आहे.

रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

दुसरीकडे, अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष असताना चाकणकर यांनी खरातशी संबंधित प्रकरणात काही निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात अशोक खरात सांगण्यावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात महिला आयोगाने सुनावणी ठेवली होती. पीडितेने नीरज जाधव विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात शिर्डी पोलिसांना महिला आयोगाकडून नोटीस देण्यात आली होती. १७ मार्चला आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास आधीच SIT कडे वर्ग झाल्याने शिर्डी पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिला होता. फेब्रुवारीमध्ये शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ५ आणि ९ मार्चला महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीचे पत्र पाठवण्यात आले होते.

शिवनिका ट्रस्टचा मुद्दा

रुपाली चाकणकर या अशोक खरातशी संबंधित शिवनिका ट्रस्टशी जोडल्या असल्याचे म्हटले जात आहे. या ट्रस्टच्या आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींचीही SIT आता चौकशी करत आहे. यामुळे चाकणकर यांच्यासह ट्रस्टच्या आजी-माजी सदस्यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रकरणात प्रथमच एखाद्या राजकीय व्यक्तीची SIT चौकशी होणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर यांनी यापूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि नंतर राष्ट्रवादीच्या महिला विंगच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.