AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Case : खरात प्रकरणात आणखी एक खुलासा, मंत्रिपद मिळावं म्हणून नीलम गोऱ्हेंनी घेतली खरातची भेट; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोऱ्हे खरातला अनेक वर्षांपासून ओळखत होत्या आणि कोरोनापूर्वी त्यांची भेट घेऊन भविष्य बघितल्याचा दावा देसाईंनी केला. महिलांवरील शोषणाच्या या गंभीर प्रकरणात नीलम गोऱ्हेंनी आतापर्यंत शांत का राहिल्या, यावर देसाईंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Ashok Kharat Case : खरात प्रकरणात आणखी एक खुलासा, मंत्रिपद मिळावं म्हणून नीलम गोऱ्हेंनी घेतली खरातची भेट; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ
तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप
| Updated on: Mar 30, 2026 | 10:51 AM
Share

महिलांच्या लैंगिक शोषणाचा, त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या भोंदू अशोख खरात (Ashok Kharat) प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली असून या केसमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अनेक राजकारणी, नेते, सेलिब्रिटी हे खरातला भेटायला यायचे अशी माहितीदेखील समोर आली होती. यामध्ये रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांचं नाव आत्तापर्यंत अनेकवेळा समोर आलं असून चाकणकरांना तर राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला. आता याप्रकरणात एक नवी अपडेट समोर आली असून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती, शिवेसान (शिंदे गट) नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नीलम गोऱ्हे या अशोक खरातला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. कोरोनापूर्वी त्यांनी खरातची भेट घेतली होती. एवढंच नव्हे तर खरातने नीलम गोऱ्हेंचं भविष्य सांगितलं होतं, आमदारकीसाठी गोऱ्हे या खरातल्या भेटल्या असा आरोप देसाई यांनी केला आहे. कदाचित गोऱ्हे यांना खरातच्या काळ्या कारवायांची माहिती नसेल, पण आता अनेक महिलांनी खरातची गैरकृत्य सांगितल्यानंतर, गोऱ्हे यांनी खरातविरोधात आवाज का उठवला नाही?, आपल्या भेटीची माहिती त्यांनी का दिली नाही?, असा सवालही देसाई यांनी विचारला.

काय म्हणाल्या तृप्ती देसाई ?

मंत्रीपद मिळावं, ते भविष्य बघण्यासाठीसुद्धा कॉलेजरोडच्या खरातच्या ऑफीसमध्ये नीलम गोऱ्हे या पोहोचलेल्या होत्या. नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याला एक्स्प्रेस इन नावाचं जे हॉटेल आहे , (कोरोनाच्या काळाच्या आधी) तिथे नीलम गोऱ्हे मुक्कामाला होत्या. त्यावेळी अशोक खरात हा एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये नीलम गोऱ्हे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता. हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेक जण या प्रकरणात बोलत नव्हते, त्यात सर्वात महत्वाचा चेहरा होता तो नीलमताई गोऱ्हेंचा.  कारण नीलम गोऱ्हेंना आपण पाहिलं आहे, अगदी छोटी प्रकरणी असली तरी त्याबद्दल प्रेस नोट काढण, त्यावर जाहीरपणे त्या बोलत असता. पण आता अख्खं अधिवशेन झालं, तिथे त्या उपसभापती म्हणून आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणा मुद्दा आला की नीलमताई या पाडितेला भेटायला जातात. पण इथे 150 हून अधिक व्हिडीओ पोलिसांकडे आले, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली, तेजस्वीनी सातपुते या महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. तरीही एक महिला नेतच्या म्हणून, जबाबदारीचं पद (विधानपरिषदेच्या उपसभापती) आहे, या खरात प्रकरणात नीलम गोऱ्हे आत्तापर्यंत काहीच बोलल्या नाहीत, ते का असा सवाल तृप्तची देसाई यांनी विचारला.

नीलम गोऱ्हेंसोबतच्या व्यक्तीनेच दिली माहिती 

याचं कारण म्हणजे अशोक खरातचं संबंध हा नीलम गोऱ्हे यांच्याशी आहे. नीलम गोऱ्हे या खरातला भविष्य दाखवायला जायच्या. ज्या भेटी मी सांगितल्या, त्या भेटींमध्ये नीलम गोऱ्हे यांच्यासोबत जी व्यक्ती तिथे उपस्थित होती, त्यांनीच मला ही माहिती पुण्यामध्ये येऊन दिली आहे, असा मोठा खुलासा तृप्ती देसाई यांनी केला.

नीलम गोऱ्हे या स्पष्टवक्त्या आहेत, जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं, तेव्हा त्यांनी हे सगळं सांगायला हवं होतं, यासंदर्भात आवाज उठवायला हवा होता. अशोक खरात जरी त्यांच्या परिचयाचा असला तरी या प्रकरणात आता मी आवजा उठवणार अशी भूमिका नीलम गोऱ्हे यांची असायला हवी होती असंही तृप्ती देसाई म्हणाल्या. सगळं समोर आल्यावरही नीलम ताई शांत बसलेल्या आहेत, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशी टीकाही देसाई यांनी केली.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...